Suresh Dhas-Dhananjay Munde-Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : ‘इतक्या क्रूर माणसाला भेटायला जायची काय गरज होती?; धस हा विषय माझ्यासाठी संपलाय’

Suresh Dhas-Dhananjay Munde Meeting : मला सुरेश धस यांच्यावर प्रश्नच विचारू नका. कारण मी आणि समाजाने धस यांना काय जीव लावला होता, हे मला माहिती होतं. कोणी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणी कशात सहभागी व्हावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Vijaykumar Dudhale

Jalna, 22 February : संतोष देशमुख खूनप्रकरणी आवाज उठविणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यंतरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यावरून राज्यात वादळ उठलेले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धसावर टोकदार शब्दांत हल्लाबोल केला. आजही त्यांनी सुरेश धस यांचा समाचार घेताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटायला जायची काय गरज होती. माझ्या धस हा विषय आता संपलाय, अशी खरमरीत टीका केली.

आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्या वेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आमदार धस यांना पाठिंबा जाहीर केला. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले,‘पाठिंबा देण्याचा ज्याचा त्याचा विषय आहे. धस यांच्यावर आता मला काही बोलायचेच नाही. माझ्यासाठी सुरेश धस हा विषय आता संपलेला आहे.’

सुरेश धस यांना मी एवढा जीव लावला होता. मराठा समाजानेही त्यांना तळहातावर घेतले होते. ती जागाच (धनंजय मुंडे भेट) नव्हती जायची. इतक्या क्रूर माणसाला जाऊन भेटणं, काय गरजेचं नव्हतं. तुमच्यावर पक्षाचा दबाव असेल, तर तुम्ही सरळ सगळं सांगायचं होतं. पक्षाने माझ्यावर दबाव आणला आहे. संतोष देशमुख खून प्रकरण दबाव टाकावं, असं मला सांगण्यात येत आहे. तू मागं सरक. तू सगळी फोडाफोड कर आणि तू धनंजय मुंडे यांना जाऊन भेट, असं पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी सांगायला पाहिजे होतं, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केली.

जरांगे पाटील म्हणाले, मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही. मला पक्षाचा आणि सरकारचा दबाव आहे. मला ते जमणार नाही. मी मराठ्यांसाठी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो. पण, धनंजय मुंडे यांना भेटायला जाऊ शकत नाही. भाजपचा राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता. ते जर पुन्हा अपक्ष निवडणुकीला उभे राहिले असते, तर त्यांना मराठ्यांनी एका शिक्क्याने एक लाख ६७ हजार मतं दिली असती. एचढी मोठी लाट तयार झाली असती.

मला सुरेश धस यांच्यावर प्रश्नच विचारू नका. कारण मी आणि समाजाने धस यांना काय जीव लावला होता, हे मला माहिती होतं. कोणी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणी कशात सहभागी व्हावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यात मला पडायचं नाही आणि सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

उपरोधिक टीका

दवाखान्यात ॲडमिट असणाऱ्या धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी सुरेश धस यांनी जायलाच पाहिजे ना. तुम्हाला माणुसकी आहे की नाही. असं कसं माणुसकी जीवंत असली पाहिजे. ती पारिवारीक भेट होती, त्यांचा परिवार आहे ना, अशी उपरोधिक टीका मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे-धस भेटीवर केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT