Dhas Munde Meeting : सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेटीची माहिती बाहेर काढणारा 'तो' नेता कोण? बीडमधील आमदार की...

Who Leaked Suresh Dhas Dhananjay Munde Meeting Details : सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी समोर आल्याने धस हे बॅकफूटवर गेलेत. प्रत्येक वेळी माध्यमांना माहिती देणारे धस यांनी मुंडेंच्या भेटीची बातमी माध्यमांना कळू दिली नव्हती.
Dhananjay Munde And Suresh Dhas
Dhananjay Munde And Suresh Dhas Sarkarnama
Published on
Updated on

Suresh Dhas News : महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीमुळे वादळ निर्माण झाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आक्रमक झालेले सुरेश धस हे सातत्याने वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते. मात्र, अचानक धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याची बातमी समोर आल्याने सुरेश धस यांना बॅकफूटवर जावे लागले आहे. प्रत्येक वेळी माध्यमांना माहिती देणारे धस यांनी मुंडेंच्या भेटीची बातमी माध्यमांना कळू दिली नव्हती. त्यामुळे मुंडे-धस यांच्या भेटीची माहिती बाहेर काढणारा कोण? याची विचारणा होते आहे.

सुरेश धस यांनी सांगितले की, षडयंत्र रचून ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. कोणीतरी व्यवस्थित षडयंत्र रचत आहे. मी त्याचा पर्दाफाश करेल. ही माहिती बीडमधीलच नेत्याने बाहेर काढल्याचे संकेत देखील सुरेश धस यांनी दिले आहेत.

Dhananjay Munde And Suresh Dhas
Dhas-Munde Meeting : बावनकुळेंनी सुरेश धसांना पुन्हा उघडे पाडले; म्हणाले, ‘धनंजय मुंडेंसोबत 28 दिवसांपूर्वीच भेट झालीय...’

सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आक्रमक झाले होते. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्याने तसेच त्यांच्यावर कृषी विमा घोटाळा केल्याने ते सतत चर्चेत होते. मात्र, मुंडे यांचीच भेट घेतल्याने त्यांच्या विश्वासर्हतेला तडा गेला. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सुरेश धस हे वरचढ होत आहेत त्यामुळेच त्यांच्या भेटीची बातमी महायुतीमधीलच नेत्याने फोडल्याची चर्चा आहे.

बीड जिल्ह्यामध्ये महायुतीचे सुरेश धस, धनंजय मुंडें यांच्यासह प्रकाश सोळुंके, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडीत हे आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांवर संशयाची सुई असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या आमदार, मंत्री पंकजा मुंडे यांना देखील सुरेश धस यांनी आरोप करत त्यांनी आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर देखील संशयाची सुई आहे. मात्र, भेटीची माहिती बाहेर काढणार नेता कोण हे स्पष्ट होऊ शकले नाही.

बावनकुळेंनीच केली धसांची कोंडी

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची माहिती समोर आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मध्यस्थीने धस आणि मुंडे भेटल्याचे सांगितले होते. तसेच ते साडेचार तास सोबत असल्याचे म्हटले होते. बावनकुळेंच्या या कबुलीमुळे धस यांची कोंडी झाली. बावनकुळे यांनी आत्ता आपल्या वक्तव्यावरून माघार घेत 28 दिवसांपूर्वी मुंडे आणि धस यांची भेट झाल्याचे म्हटले आहे.

Dhananjay Munde And Suresh Dhas
Angar Upper Tehsil : माजी आमदार राजन पाटील यांना दणका; अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा हायकोर्टाचा आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com