Mahayuti News : युतीसाठी आम्ही कोणाच्याही मागे जाणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याने भाजपला सुनावले

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह इतर सर्व निवडणुका भाजप सातारा जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार आहे, असे धैर्यशील कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्यात वादाला तोंड फुटले आहे.
BJP-Shambhuraj Desai
BJP-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 22 February : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमध्ये खडाखडी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात एकत्र लढायचे की स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवायची यावरून सध्या महायुतीमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही पलटवार करत ‘आम्ही कोणालाही जबरदस्ती करणार नाही, आम्हीही युतीसाठी कोणाच्या मागे लागणार नाही,’ असे देसाई यांनी भाजपला सुनावले आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात त्याचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याऐवजी सत्ताधारी महायुतीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता सध्याच्या स्थितीवरून दिसून येत आहे. तशी जाहीर विधाने महायुतीच्या नेत्यांकडून होताना दिसत आहेत. ती अगदी जिल्हापातळीपर्यंत पोचल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे सातारा (Satara) जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात तीन लाख २० हजार सदस्य नोंदणी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आता भारतीय जनता पक्षाचा बोलकिल्ला बनला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल, असे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह इतर सर्व निवडणुका भाजप सातारा जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार आहे, असे धैर्यशील कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्यात वादाला तोंड फुटले आहे. महायुतीमधील तीनही पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार की महायुतीमधून एकत्र निवडणूक लढविणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

BJP-Shambhuraj Desai
Donald Trump: ट्रम्प यांचा पुन्हा मोठा झटका; प्रशासनाची झोप उडवली, लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला 16 महिन्यांतच हटवलं

याबाबत शिवसेनेचे पाटणचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या घोषणेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महायुती राज्यात सत्तेवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवावी, असे आमचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी आम्ही कोणालाही जबरदस्ती करणार नाही आणि युतीसाठी आम्ही कोणाच्या मागेही जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

BJP-Shambhuraj Desai
Shivsena UBT : "ठाकरेंच्या शिवसेनेत संवाद नाही, केवळ चाटूकारांची फौज..."; प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेल्या तिवारींचा राऊतांसह ठाकरेंवर हल्लाबोल

जिल्हास्तरावर महायुती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण भाजपला युती नको असेल तर आम्हीही कोणाच्या मागे जाणार नाही. आमचीही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com