Beed News, 15 Nov : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याला प्रशासनाने मोठा धक्का दिला आहे. सोलापूरमधील गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुशील कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी सुशील कराडचा कमरेला शस्त्र लावलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाचीही प्रशासनाने दखल घेतल्याचे सांगितले जात आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर येथे सुशील वाल्मिक कराड याच्यासह तिघांविरोधात पोक्सो कायद्यासह तब्बल १४ कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवणे, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. तसेच, बळजबरीने प्लॉट, दोन बल्कर ट्रक, कार आणि सोन्याचे दागिने घेतल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पीडितेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुशील कराड याच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, सुशील कराडचा कमरेला शस्त्र लावलेला व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सोलापूरमधील गंभीर गुन्ह्याची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. या धडक कारवाईमुळे प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर कडक वचक निर्माण केल्याचे स्पष्ट होत असून, सर्वसामान्य नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.