Deepak Kesarkar Sarkarnama
मराठवाडा

Deepak Kesarkar: शिक्षक भरतीचा प्रश्न विचारताच केसरकर संतापले; भावी शिक्षिकेला थेट अपात्र करण्याचा भरला दम

Datta Deshmukh

Beed News: राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक भरतीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आता याच शिक्षक भरतीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. शिक्षक भरतीच्या मुद्यांवरून विचारलेला प्रश्न दीपक केसरकारांना चांगलाच झोंबला.

उत्तर देऊन वेळ मारून नेण्याऐवजी केसरकर संतापले आणि तुमची माहिती घेऊन अपात्र करण्याची धमकीच त्यांनी भावी शिक्षिकेला दिली. शिक्षक भरतीवरून बीडमध्ये भावी शिक्षक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. "तुम्ही बेशिस्त वर्तन करताय, तुमची माहिती घेतो आणि अपात्र करतो", असे केसरकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त मन्मथ स्वामी यांच्या समाधीची शासकीय महापूजा दीपक केसरकर व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडली. यानंतर शिवा संघटनेच्या मेळाव्याला दोघांनी हजेरी लावली. मेळाव्यानंतर केसरकरांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी "स्पर्धा परीक्षेची मेहनत घेऊन तयारी केली. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून भरती रखडली आहे, आमचं नुकसान होत आहे, टीईटी पात्र आहोत, फक्त ऑनलाईन फॉर्म भरून घेतला, आता काहीच प्रक्रिया केली जात नाही, नेमकी भरती कधी होणार ?", असा प्रश्न एका भावी शिक्षिकेने मंत्री केसरकरांना विचारला.

हा प्रश्न विचारताच दीपक केसरकर चांगलेच संतापले. "तुम्ही बेशिस्त वर्तन करत आहात, तुमची सगळी माहिती घेऊन तुम्हाला डिसमीस करेन", असा थेट दमच केसरकरांनी या महिलेला दिला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT