Raj Thackeray : ''सरकार आणि पाऊस कधी येतील अन् कोसळतील...'' ; राज ठाकरेंच्या विधानाची चर्चा!

MNS News : 'दिंडोशी सांस्कृतिक महोत्सवात' होणारी मुलाखत केली रद्द, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथे 'दिंडोशी सांस्कृतिक महोत्सवात' हजेरी लावली. खरंतर या ठिकाणी त्यांची सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत घेतली जाणार होती. मात्र, राज ठाकरे यांनी ही मुलाखत पावसामुळे रद्द केली. शिवाय, आपला हा निर्णय सांगताना त्यांनी एक टोलाही लगावला.

राज ठाकरे म्हणाले, ''अचानक पावसाचं काय सुरू झालं, कोणालाच काही कळत नाही. सध्या सरकार आणि पाऊस हे कधी येतील आणि कधी कोसळतील काही कळत नाही. पण आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम, मुलाखत सुरू असताना एकतर आमच्या डोक्यावर छप्पर, तुमच्या डोक्यावर नाही. त्यातमध्ये पाऊस आणि अशा परिस्थितीत मी काही मुलाखत देऊ इच्छित नाही.''

याशिवाय, ''याचं महिन्याची एक तारीख निवडून मी याच ठिकाणी मुलाखत देईन हा शब्द देतो." असं म्हणत राज ठाकरेंनी उपस्थितांना आश्वासनही दिलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
MLA Nilesh Lanke : ...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार लंकेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र!

तत्पूर्वी ''महाराष्ट्र धुमसतोय आणि राजकारणी ह्याच संधीचा फायदा घेण्यासाठी , स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सरसावले आहेत अशा टप्प्यावर प्रबोधनकारांचा नातू, ठाकरी विचारांचा धगधगता अंगार राज आज महाराष्ट्र चेतावणार आहेत.'' तसेच, ''आज संध्याकाळी ७ वाजता मुंबईत राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत, ऐकायला विसरू नका.'' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोशल मीडियाद्वारे कळवण्यात आले होते.

मात्र राज ठाकरे यांनी पावसामुळे मुलाखत देण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केल्यानंतर मनसेने ''महत्त्वाची सूचना : मुंबईत अचानक आलेल्या पावसामुळे मोकळ्या जागेत आयोजित केलेला राज ठाकरेंच्या मुलाखतीचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करू, याची सर्वांनी नोंद घ्यावी.'' अशा स्वरुपात ट्वीट करत माहिती दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Raj Thackeray
Jitendra Awhad : शरद पवारांना अचानक राबोडीत आणून आव्हाडांचे अजित पवार गटाला आव्हान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com