Sharad Pawar Speech: शरद पवारांचं पुन्हा एकदा भर पावसात भाषण; कार्यकर्त्यांना धीर देत म्हणाले...

NCP News: शरद पवारांनी आज भर पावसात केलेल्या भाषणावरून अनेकांना झाली साताऱ्यातील सभेची आठवण
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईतील नेरुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. पण या मेळाव्यादरम्यान अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यक्रमावेळी होणारा स्वागत समारंभाचा कार्यक्रम थांबवत थेट भाषणाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शरद पवारांनी भर पावसात भाषण केलं. "अनेक महिलांनी चांगले स्टॉल उभे केले आहेत. पण पावसामुळे निराशा झाली. मात्र, माझं तुम्हाला एक सांगणं आहे. निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधीही येऊ देऊ नका. निराशावर मात करायची. संघर्ष करायचा आणि धैर्याने पुढे जायचं. हा निर्धार आज आपण करु", अशा शब्दात पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला. यावेळी पाऊस जास्त येत असल्याने त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Balasaheb Thorat: कॅबिनेट मंत्रिपद मिळत असताना थोरात का झाले होते राज्यमंत्री ? स्वतःच सांगितला किस्सा

पण शरद पवारांनी आज भर पावसात केलेल्या भाषणावरून 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या एका सभेची आठवण अनेकांना झाली. साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील उमेदवार होते. या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली होती.

त्यांची ती सभा चांगलीच गाजली होती. एवढंच नाही तर या एका सभेमुळे निकाल पालटल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे त्या सभेची चर्चा देशभर झाली होती. आजही असाच काहीसा प्रसंग पाहायला मिळाला. पण आजच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पावसामुळे आपलं भाषण आटोपतं घेत दोन मिनिटामध्ये संपवलं.

(Edited By - Ganesh Thombare)

Sharad Pawar
Prajakt Tanpure : जायकवाडीसाठी पाणी सोडण्यावरुन आमदार तनपुरेंचे मोठे विधान ; म्हणाले,"आमचे सरकार आल्यावर...!"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com