Marathwada News : केज तहसिल कार्यालयातील तत्कालीन नायब तहसिलदार - महसूल व सध्या छत्रपती संभाजीनगरला संजय गांधी योजनेच्या तहसिलदार आशा दयाराम वाघ यांच्यावर अखेर केज पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला. तहसिलदार (Tahsildar) राकेश गिड्डे यांनी याबाबत फिर्याद दिली असून तहसिलदार, शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आशा वाघ केज तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार असताना त्यांनी तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांनी अर्धन्यायिक प्रकरणांचे बनावट आदेश दिल्याचा प्रकार 'सकाळ'ने समोर आणून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. यानंतर मंगळवारी (ता. नऊ) जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसिलदार राकेश गिड्डे यांना सदर प्रकरण फौजदारी स्वरुपाचे असल्याने गुन्हा नोंद करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर रात्री उशिरा गिड्डे यांनी केज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरुन आशा वाघ यांच्यावर गुन्हा (Crime) नोंद झाला. जिल्ह्यातील महसूल विभागातील बनावट लवाद आदेशाने 241 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच हा घोटाळा समोर आला होता. वाघ यांनी फेब्रुवारी ते जुन या कालावधीत दहिफळ वडमाऊली, लाडेगाव, नांदूरघाट आणि वाघेबाभुळगाव येथील जमिनीबाबत बनावट अर्धन्यायायिक आदेश काढले.
त्यांनी तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या न्यायालयात अशा लेटरहेडवर गिड्डे यांच्याच बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा अहवाल राकेश गिड्डे, नायब तहसिलदार ए. एन. भंडारे, सहाय्यक महसूल अधिकारी जी. पी. नन्नवरे, महसूल सहाय्यक एम. के. कोकरे या साक्षीदारांनी पाठविला. याच सोबत त्यांनी आपत्ती निवारण कामात दुर्लक्ष, निवडणुक कामात हयगय व गैरहजर राहणे असे ठपके ठेवत त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली.
दरम्यान, सदर आदेशाची अधिकार अभिलेखात नोंद घेण्याचे निर्देशही त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवरुन दिले. विशेष म्हणजे या संचिकाही त्यांनीच ताब्यात ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. केजचे तहसिलदार, संबंधीत शेतकरी व प्रशासनाची दिशाभूल करुन बेकायदेशिर कृत्य केल्यावरुन गुन्हा नोंद झाला आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी फिर्याद देण्याबाबत मला प्राधिकृत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याचे तहसिलदार राकेश गिड्डे म्हणाले. तर, तहसिलदारांच्या फिर्याद आणि संबंधीत कागदपत्रांच्या आधारे गुन्हा नोंद केल्याचे केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल उनवणे यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.