Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका? शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीनंतर 'या' बड्या नेत्यानं घेतली मोदींची भेट

Sharad Pawar Ajit Pawar meeting : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतानाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि केंद्रातील सरकारांशी दुवा म्हणून निर्णायक भूमिका पार पडली होती. सध्याही अजितदादांच्या पक्षात त्यांच्याकडे हाच रोल दिला असल्याचं दिसून येत आहे.
ajit pawar sharad pawar narendra modi
ajit pawar sharad pawar narendra modi sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षे जुनं राजकीय वैर मिटवत एकत्र आले. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अचानकपणे एकाच गाडीतून प्रवास करत ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नवी दिल्लीतील निवासस्थानी गाठल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला 24 उलटत नाही,तोच आणखी एक मोठी राजकीय घडामोड दिल्लीत घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व खासदार प्रफुल पटेल यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर खासदार प्रफुल पटेल हे कायमच दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी आणि अजित पवार यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावत आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. गुरुवारी(ता.11) सकाळी संसदीय पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान मोदी आणि खासदार प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण भेट पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये प्रफल पटेल (Prafull Patel) यांचा समावेश होतो. त्याचमुळे एकीकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बुधवारी(ता.10) रात्री शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड अतिशय महत्त्वाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

ajit pawar sharad pawar narendra modi
Uddhav Thackeray News: भाजपचा वार जिव्हारी; उद्धव ठाकरेंनी नागपुरात जाऊन शाह अन् फडणवीसांचा हिशेब चुकता केला; म्हणाले...

महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री व महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेलांनी थेट लगबगीनं दिल्ली गाठत शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थिती लावली होती.

आता शरद पवारांच्या भेटीनंतर काही तासांतच प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे आणि दुसरीकडे महायुतीत नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केल्यामुळे महायुतीत नेमकं घडतंय तरी काय अशी चर्चा सुरू आहे.

ajit pawar sharad pawar narendra modi
PMC Election: सर्व्हेत भाजपच्या 50 जागा धोक्यात! मित्रपक्षांना विचारात घ्या अन्यथा...; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतानाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि केंद्रातील सरकारांशी दुवा म्हणून निर्णायक भूमिका पार पडली होती.सध्याही अजितदादांच्या पक्षात त्यांच्याकडे हाच रोल दिला असल्याचं दिसून येत आहे.पटेल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.ही भेट राज्याच्या राजकारण बदलणार तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना भोजनासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. या भोजन समारंभाला देशभरातील बडे नेते, खासदार एकत्र आले आहेत. येत्या 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असतो. पण त्या दिवशी शरद पवार हे मुंबईत असणार आहे.म्हणूनच शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com