Shivsena UBT On Kathua Attack Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : 'कश्मीर देश का अटूट अंग है', म्हणता पण आतंकवाद जम्मूपर्यंत पोहोचला; ठाकरे गटाची तोफ धडाडली

Jammu Terrorist Attack : अतिरेकी हल्ल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांना पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या काही महिन्यांपासून कश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लोकसभा निवडणुका होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तारूढ झाल्यानंतर अतिरेकी हल्ले थांबत नाहीत.

आतापर्यंत कश्मीरच्या खोऱ्यापर्यंत असलेला दहशतवाद आता जम्मू भागात पोहोचला आहे, याकडे लक्ष वेधत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर तोफ डागली.

कथुआ भागात गस्तीवर असलेल्या जवानांवर झालेल्या हल्लाने अतिरेक्यांनी पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे. या अतिरेकी हल्ल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांना पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जम्मू काश्मीरच्या कथुआ भागात अतिरेकी हल्ल्यात गस्तीवरील पाच जवानांना वीर मरण आले. हॅन्ड ग्रेनेड आणि स्नायपरच्या साथीने केलेल्या या हल्ल्यानंतर अतिरेकी निसटून गेले आहेत. या हल्ल्याची करावी तेवढी निंदा कमी आहे. 'कश्मीर देश का अटूट अंग है' म्हणणाऱ्या केंद्राच्या डोक्यावर अतिरेकी मिरे वाटत असल्याचा घाणाघात दानवेंनी केला.

आता दहशतवाद काश्मीर खोऱ्यातून बाहेर येत जम्मू भागातही आपली पाळेमुळे घट्ट रोवू पाहतो आहे. विशेष म्हणजे, काश्मीर टायगर्स नावाच्या एका संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेत पत्रक जारी केले आहे. या पत्रकात त्यांनी वापरलेली मग्रुरीची भाषा एकदा वाचाच, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या सरकारने कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित केल्याचा आणि दहशतवादी कारवाया रोखल्याचा दावा केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या प्रत्येक नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता.

निवडणुकीत मात्र 'अब की बार चारसौ पार'चे मिशन फेल गेले. भाजपला इतर मित्र पक्षांच्या मदतीने केंद्रात एनडीचे सरकार स्थापन करावे लागले. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीने सरकारला अनेक मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला असताना जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. सर्वसामान्यांमध्ये याची चर्चा आता होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाकडून मात्र अजूनही अतिरेकी हल्ल्यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT