Thackeray group shiv sena protest panchayat samiti member Sarkarnama
मराठवाडा

Thackeray Group Protest : "50 लाखांत विकले गेले?": ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा संताप; पंचायत समिती सदस्याच्या घरासमोर जोरदार राडा!

Thackeray faction shiv sena agitation Maharashtra news : 50 लाखांच्या कथित व्यवहारावरून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पंचायत समिती सदस्याच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. घोषणाबाजी आणि तणावपूर्ण वातावरणामुळे परिसरात खळबळ उडाली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar Panchayat samiti election news : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराची गचंडी धरून मारहाण केल्याच्या घटनेमुळे चर्चेत आली. शिवसेनेच्या तीन सदस्यांना विद्यमान सभापती कैलास गायकवाड यांनी पैशाच्या जोरावर खरेदी केल्याचा आरोप करत ऐन सभापती पदाच्या निवडणुकीच्या दिवशीच शिवसेनेने राडा घातला होता.

सभापती उपसभापती निवडणुकीच्या दिवशी शिवसेनेचे तीन सदस्य गायब असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी अंबादास दानवे यांच्याकडे केली होती. त्यानंतर सकाळी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कैलास गायकवाड यांची थेट कॉलर पकडत त्यांना जाब विचारला होता त्यानंतर शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले होते. या राड्यानंतरही गायकवाड यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. भाजपचा सभापती झाल्यानंतर सभागृहाबाहेर अंबादास दानवे व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी रात्री गद्दारी करणाऱ्या तीन पंचायत समिती सदस्यांच्या घरासमोर जाऊन जोरदार नारेबाजी केली हे सदस्य 50 लाखात विकले गेले असा आरोप शिवसैनिकांनी केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडणुकीत मतदानावेळी गैरहजर राहिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित सदस्यांच्या घरासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सूचनेनुसार मतदानाला अनुपस्थित राहिल्याने सदस्य सतीश बाळू हिवाळे, दत्तात्रय भास्कर वर्पे आणि लताबाई कानडे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी पक्षनिष्ठा भंग केल्याप्रकरणी संबंधित सदस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT