Baramati By Election : महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे पडघड : तयारी अंतिम टप्प्यात, आयोगाच्या घोषणेकडे लक्ष

Baramati by election preparation news : महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बारामती मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
maharashtra assembly bypolls 2026,
maharashtra assembly bypolls 2026,Sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लवकरच पोटनिवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. प्रशासनाने निवडणुकीसाठीची तयारी जवळपास पूर्ण केली असून आता सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून बारामती मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार नोंदवले गेले आहेत. यामध्ये 1 लाख 93 हजार 496 पुरुष, 1 लाख 90 हजार 271 महिला आणि 24 इतर मतदारांचा समावेश आहे.

maharashtra assembly bypolls 2026,
Teacher Verification : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ! 3 लाख कर्मचाऱ्यांची कुंडली तपासणार; SIT ॲक्शन मोडमध्ये!

यापूर्वी 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नागरिकांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची तपासणी करून आवश्यक बदल करण्यात आले आणि त्यानंतर 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर आता बारामती पोटनिवडणुकीची तारीख कधी जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीची तयारी वेगाने सुरू आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वीपासून निवडणूक आयोगाने येथे पूर्वतयारी सुरू केली होती. या मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 14 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण मतदारसंख्या 3 लाख 32 हजार 952 इतकी आहे. त्यामध्ये 1 लाख 71 हजार 988 पुरुष आणि 1 लाख 60 हजार 963 महिला मतदारांचा समावेश आहे.

maharashtra assembly bypolls 2026,
PM Kisan 22 Installment : बळीराजासाठी मोठी बातमी! पीएम किसानचा 22 वा हप्ता 'या' दिवशी होणार जमा? महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याने मारली बाजी!

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

काय सांगतो कायदा?

भारतीय संविधानातील कलम 164(4) नुसार एखादी व्यक्ती विधानमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र शपथ घेतल्यानंतर सलग 6 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीने विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे आवश्यक असते. अन्यथा त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे बारामती पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com