Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

MLA Sanjay Shirsat News : पंतप्रधान मोदी विमानतळाबाहेरही आले नाही, मग नौटंकी कशाला ?

The agitation by the MahaVikas Aaghadi against Prime Minister Modi is a drama : महिलांवरील अत्याचारावर अंबादास दानवे यांना बोलण्याचा अधिकार नाही. या विषयावर मी अधिक काही बोलू इच्छित नाही, असे म्हणत शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनाला नौटंकी याशिवाय दुसरा कुठलाही शब्द नसल्याचे म्हटले आहे.

Jagdish Pansare

Shivsena Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळाबाहेरही आले नाहीत. मग महाविकास आघाडीने काळे कपडे घालून निदर्शने करण्याची नौटंकी कशासाठी केली? अशा शब्दात शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे यांच्यावर टीका केली. `लखपती दीदी` योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आले होते.

संभाजीनगर मार्गे जळगावला जात असताना चिकलठाणा विमानतळाबाहेर महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात निदर्शने केली. बदलापूरसह देशभरात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून निदर्शने केली. थेट मोदी यांच्या विरोधात निदर्शने केल्यामुळे महाविकास आघाडीचे हे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

मात्र महायुतीने या आंदोलनाला `नाटक` म्हणत टीका केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी या आंदोलनाला नौटंकी असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर उतरले होते. तिथूनच ते विशेष विमानाने जळगावला गेले.

मग जे पंतप्रधान मोदी विमानतळाबाहेरही आले नाहीत, ज्यांना महाविकास आघाडीच्या या आंदोलनाची माहिती नाही त्या आंदोलनाला नाटक नाही तर काय म्हणायचे? (Sanjay Shirsat) मुळात विरोधकांकडे आता काही काम उरलेले नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करून ते लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

महिलांवरील अत्याचारावर अंबादास दानवे यांना बोलण्याचा अधिकार नाही. या विषयावर मी अधिक काही बोलू इच्छित नाही, असे म्हणत शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनाला नौटंकी याशिवाय दुसरा कुठलाही शब्द नसल्याचे म्हटले आहे. आंदोलन करायचेच होते तर पंतप्रधानांच्या समोर जायचे होते, पण ते त्यांच्यापर्यंत पोहचूच शकत नाही.

पोलिसांनी विमानतळाच्या कितीतरी लांब आंदोलकांना आणि अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीने पंतप्रधानांच्या विरोधात केलेले आंदोलन म्हणजे केवळ स्टटंबाजी होती, याचा पुनरुच्चार शिरसाट यांनी केला.

दरम्यान, काल बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शहरातील क्रांतीचौकात सरकारविरोधात निदर्शने केली होती. त्यानंतर अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्या दरम्यान चिकलठाणा विमानतळासमोर निदर्शने करण्याचे ठरवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT