CM Devendra Fadanvis | Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : तेवीस वर्षाचा पोऱ्या हातावर तुरी देतोयं, सरकार मुंडेंचा राजीनामा घेत नाहीये; किती हा निगरगट्टपणा!

Ambadas Danve criticizes Devendra Fadanvis : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाहीये. या सगळ्या घडामोडी सुरू असताना अंबादास दानवे यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला आहे. यातील बहुतांश आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. परंतु एक आरोपी अजूनही फरार आहे. वाल्मिक कराड याचे अनेक कारणामे सीआयडीच्या चौकशीतून समोर येत आहेत, तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे. सरंपच संतोष देशमुख खून प्रकरणातील एक तेवीस वर्षाचा पोऱ्या आरोपी कृष्णा आंधळे महिनाभरापासून पोलिसांच्या हातावर तुरी देतोय. सरकार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही, कितीहा निगरगट्टपणा, अशा शब्दात दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या खूनाचा संपुर्ण तपास होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना हटवा, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली जात आहे. परळी येथील अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खडणी मागितल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राईटहॅंड वाल्मिक कराड सीआयडीच्या कस्टडीत आहे.

तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाहीये. या सगळ्या घडामोडी सुरू असताना अंबादास दानवे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ 23 वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय.

दुसरीकडे जनभावनेचा आदर म्हणून सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. किती हा निगरगट्टपणा. 'निगरगट्ट' शब्द पण लाजवला यांनी आता तर! सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्ही कोणाला सोडणार नाही. महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर! असा टोला अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावरील पोस्टमधून मुख्यमंत्री व सरकारला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT