Ambadas Danve - Eknath Shinde
Ambadas Danve - Eknath Shinde  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर दानवेंचा गंभीर आरोप, म्हणाले,''शिंदे गटातील...''

सरकारनामा ब्यूरो

Aurangabad News : औरंगाबाद येथे ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याचदरम्यान, ठाकरे यांच्या गाडीवरील हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सरु झाला आहे. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा नाशिक, जालना, बीड, औरंगाबादमध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील महालगाव येथे आमदार आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रेचा कार्यक्रम आणि रमाबाई आंबेडकर यांची मिरवणूक एकाचवेळी सुरु झाली होती.

यावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray)च्या गाडी अडवण्यात आली. तसेच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळं काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. डीजे बंद केल्याच्या रागातून हा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आता काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अंबादास दानवेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप

भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे. त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान केलं जात आहे. यावेळी ठाकरे यांच्या गाडीवरील हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा गंभीर आरोपही दानवेंनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.

प्रकरण काय?

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे.

पोलीस महासंचालकांना पत्र..

आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना ठाकरेंच्या गाडीवरील हल्लानंतर पत्र पाठवलं आहे.  स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा ठपका यात ठेवला आहे.तसेच याबाबत एसपी, आयजींशी बोलले स्थानिक पोलिसांवर ते कारवाई करतील अशी अपेक्षाही दानवेंनी यावेळी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT