Kasaba-Chinchwad By Election : कसबा-चिंचवडसाठी भाजपची रणनीती; 'यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama

Kasaba-Chinchwad By Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं वातावरण आता तापू लागलं आहे. सुरुवातीपासून भाजपने या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. पण कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यानंतर आता या दोन्ही जागेवरील निवडणुकांची जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे.

शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याशिवाय आम आदमी, हिंदू महासभेच्या उमेदवारांनीही या निवडणुकांमध्ये शड्डु ठोकले आहेत. त्यानंतर आता मंगळवारी (७ फेब्रुवारी) भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली असून पदाधिकाऱ्यांनाही मोठी जबाबदारी दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पदाधिकाऱ्यांकडे ह्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख म्हणून म्हणून नियुक्ती केली आहे. यासह धीरज घाटे यांच्याकडे निवडणूक सहप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चिंचवडच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.

दरम्यान, कसब्याची जागा कोण लढणार यावरुन सुरुवातीपासून संभ्रम होता. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांना ‘कसब्या’तून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. पण भाजप नेतृत्त्वानेच शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारली. कसब्यात हेमंत रासने या नवीन चेहऱ्याला भाजपने संधी दिली. पण रासनेंना उमेदवारी दिल्यामुळे शैलश टिळक मात्र नाराज आहेत.

तर महाविकास आघाडीत कसब्याची जागा कॉंग्रेसकडे आल्याने काँग्रेसनेही कसबा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. रविंद्र धंगेकर यांना काँग्रेसने कसब्यातून उमेदवारी दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे (Nana kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com