Asha Shinde sarkarnama
मराठवाडा

Nanded News : भाजपच्या या बड्या नेत्यांची बहीण काँग्रेसच्या वाटेवर...

सरकारनामा ब्यूरो

- संजय सूर्यवंशी

Nanded Congress News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणाचे गणिते पूर्णतः बिघडली आहेत. काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पडले असले तरी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी एक मोठा मासा काँग्रेस पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यातील एक मोठं नाव लोहा- कंधार विधानसभेचे शेकापचे आमदार यांच्या पत्नी शेकपाच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत.

आशाताई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बहीण भावाची लढत होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सध्या नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. यातच आशा शिंदे या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार असून चर्चा करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे प्रतापराव चिखलीकरांचा पत्ता कट होणार का, अशी चर्चा सुरू होती. भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी उमेदवारी सांगितली आहे. तर, आता प्रतापराव चिखलीकर यांची बहिण आशा शिंदे कॉंग्रेसमधून लोकसभा लढणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT