Cross Voting : राज्यसभेत क्राॅस व्होटिंग; सपा व काँग्रेस नेत्यांसह भाजप आमदार फुटले !

Rajya Sabha Election : समाजवादी पार्टीचे गटनेत्यांनी उत्तर प्रदेशात राजीनामा देत राज्यसभा निवडणुकीत रंगत आणली. इतक्यावर हा खेळ थांबला नाही तर सपाचे सात तर हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता असताना दहा आमदारांनी क्राॅस व्होटिंग केल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी हे विजयी होतात की नाही हे पाहण्यासारखे ठरेल.
Rajya Sabha Election
Rajya Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Election 2024 : देशातील 15 राज्यात होत असलेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी 12 राज्यात 41 जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी झाले आहे. तर उर्वरित 15 जागांवर 18 उमेदवार रिंगणात असून क्राॅस व्होटिंग ने राज्यसभा निवडणुक चांगलीच गाजली आहे. केवळ काँग्रेस व सपा यांनीच क्राॅस व्होटिंग केले नाही तर केंद्रातील सत्तारुढ भाजप च्या एका आमदाराने क्राॅस व्होटिंग करत भाजपा घरचा अहेर दिला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे क्राॅस व्होटिंगवर राज्यसभा निवडणुक रंगली असून काही तासात या निवडणुकीचे निकाल घोषित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सात आमदारांनी एनडीए च्या उमेदवारांना मते टाकल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच सपा आणि काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी एकमत झाले होते. सपा नेत्यांनी स्वपक्षासाठी 63 ठेवत काँग्रेसला 17 जागा लोकसभेसाठी दिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला हरविण्याची रणनिती सपा व काँग्रेस आखत असताना राज्यसभा निवडणुकीत मात्र समाजवादी पक्षाच्या आमदारांनी एनडीए च्या उमेदवारांना मते टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे आमदार उत्तरप्रदेशात योगींच्या संपर्कात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करिश्माची चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajya Sabha Election
Maharashtra Budget 2024 : अयोध्या, काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याची अजित पवार यांची घोषणा अन् जय श्रीरामाचा उद्घोष

हिमाचल प्रदेशात काँग्रेस च्या दहा आमदारांनी व्हिप फिरविल्याचे चित्र समोर आले आहे. कर्नाटक, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेशात 15 राज्यसभा जागांसाठी आज निवडणुक होती. निवडणुक प्रक्रिया सुरु असतानाच समाजवादी पार्टीचे गटनेता आमदार मनोजकुमार पांडेय यांनी पक्षाचा राजीनामा देत सपा ला घरचा अहेर दिला. सपाच्या सात आमदारांनी एनडीए च्या उमेदवाराला तर हिमाचल प्रदेशातील दहा काँग्रेस आमदारांनी भाजप उमेदवाराला मते दिल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभा निवडणुकीत क्राॅस व्होटिंगचा फटका केवळ काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला बसला नाही तर कर्नाटक भाजपच्या एका आमदाराने पक्षाचा व्हिप धुडकावून लावत मनमर्जीने मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार असून अभिषेक मनु सिंघवी यांनी बहुमत होते म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवली. पण, त्यांना या निवडणुकीत भाजप उमदेवाराला काँग्रेस आमदारांनी केलेल्या क्राॅस व्होटिंगचा फटका बसण्याची चिन्हं आहे. काही तासात हे निकाल घोषित होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Rajya Sabha Election
PM Modi News: मोदींच्या सभेसाठी २६ एकरवर मंडप, दोन हजार एसटी बस, तीन लाख महिला येणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com