Kiratankar Indurikar Maharaj Latest News  Sarkarnama
मराठवाडा

इंदुरीकर महाराजांविरोधात ग्रामस्थांनी गाठलं पोलिस ठाणं! कारण ऐकूनही व्हाल हैराण...

Indurikar Maharaj : किर्तनाच्या तयारीसाठी आतापर्यंत एक ते दीड लाख रुपये खर्च केले होते.

सरकारनामा ब्यूरो

बीड : आजपर्यंत आपण किर्तनकार महाराजांवर विविध गुन्हे दाखल झालेले पाहिले आहेत. मात्र बीडच्या कळसंबर या गावात चक्क दिलेल्या तारखेला किर्तनाला येऊ न शकलेले प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी धाव घेतल्याची घटना घडली आहे. मात्र ग्रामस्थांचा गैरसमज दूर झाल्यानंतर ग्रामस्थ आल्या पाऊली पोलीस ठाण्यातून परत गेल्याची माहिती मिळत आहे.

झालेल्या या प्रकाराबद्दल कळसंबर ग्रामस्थ आक्रमक होत नेकनूर पोलीस ठाण्यात पोचले होते. इंदुरीकर महाराजांनी किर्तनाची तारीख दिली आणि ते वेळेवर किर्तनाला आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये आले होते. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महाराजांनी आज आम्हाला किर्तनाची तारीख दिली होती. यामुळे किर्तनास लोकांनी यावे याकरीता गाव परिसरात रिक्षाच्या माध्यमातून आज कीर्तन आहे, असे आवाहन केल होते. त्याचबरोबर कीर्तनाच्या तयारीसाठी आतापर्यंत एक ते दीड लाख रुपये सुद्धा खर्च केले होते. मात्र ऐनवेळी इंदुरीकर महाराजांनी मी कीर्तनाला येऊ शकत नाही,असे सांगितल्याने आमचे श्रम आणि पैसा वाया गेला आहे. त्यामुळे महाराजांनी आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार ग्रामस्थांची आहे.

महाराज आमच्या गावात आज जरी नाही आले तरी चालेल, मात्र ते जर आज दुसऱ्या इतर ठिकाणी कुठे किर्तनाला गेले, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा,अशा मागणीसाठी आम्ही पुढे येऊ,असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेमुळे परिसरात हा चांगलाच चर्चेचा मुद्दा बनला आहे.

दरम्यान इंदुरीकर महाराज हे आजारी आहेत. आपला काहीतरी गैरसमज झालाय, हे फोनवर बोलल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने ग्रामस्थ पोलीस ठाण्यामधून परत गेले. यामुळे अद्याप पर्यंत तरी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही, अशी माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुस्तफा शेख यांनी दिली.

दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होत. नेहमीच आपल्या किर्तनाच्या शैलीने चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज आज पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT