Police investigate theft at late sarpanch Santosh Deshmukh’s residence in Masajog.  sarkarnama
मराठवाडा

Crime News : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरी चोरी, मध्यरात्री चोरट्यांनी...

Santosh Deshmukh Theft Masajog : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Roshan More

Crime News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात चोरट्यांनी शिरले असल्याची माहिती आहे. घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

सकाळी देशमुख कुटुंबीयांच्या लक्षात घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या विषयीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम मस्साजोगमध्ये दाखल झाली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, आमच्या घरातून किमती साहित्य चोरीला गेले नाही. मात्र, गावात सात ते आठ ठिकाणी चोरी झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या काॅपर केबल, सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. ज्याची किंमत अंदाजे सात लाख रुपये आहे.

लवकरच गावात निवडणूक

मस्साजोग गावात निवडणूक होणार आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी या निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र. स्वरूपानंद देशमुखांच्या यांनी अश्वीनी देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT