Ashwini Deshmukh: मस्साजोग सरपंच निवडणुकीत मोठा ट्विस्ट! संतोष देशमुख यांच्या पत्नीची एन्ट्री; निवडणूक बिनविरोध होणार?

Ashwini Deshmukh: दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जाहीर झालेल्या मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News: दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जाहीर झालेल्या मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरपंचपदावर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आहे. परंतू गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याविरोधात ९ मतांनी पराभूत झालेले स्वरुपानंद विश्वनाथ देशमुख यांनी आपण सरंपचपदाची निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर केले, ते देखील उद्याच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक होणार, अशी चिन्हं आहेत.

Santosh Deshmukh Murder Case
MPSC Result: MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर! आरती जाधव महिलांमध्ये पहिली, टॉपर ठरला विजय लमकाने

दरम्यान, अश्विनी देशमुख या सरपंचपदाची निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. धनंजय देशमुख यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतू कालच त्यांनी आपण सरपंचपदाचे उमेदवार नाहीत, माझ्या वहिनींना सरपंचपदाचा व बाजार समितीच्या सभापती म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनाच बिनविरोध सरपंच करण्याचा गावकऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे काल सांगितले होते.

Santosh Deshmukh Murder Case
ST Ticket Hike: एसटीचा प्रवास महागणार! 15 एप्रिलपासून हंगामी तिकीट दरवाढ लागू; खिशावर किती ताण पडणार जाणून घ्या?

त्यानंतर आज देशमुख कुटुंबीयांनी एकमताने आणि ग्रामस्थांशी विचार विनिमय, चर्चा करुन अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केलं आहे. त्यानुसार, उद्या सकाळी ११ वाजता सरपंचपदासाठी त्या आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंचपद देणे हीच खरी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली असणार आहे, अशी गावतील महिला वर्गाचीही मागणी आहे.

Santosh Deshmukh Murder Case
बारामतीमध्ये कॉँग्रेस उमेदवार देणार? वडेट्टीवार नक्की काय बोलले? Vijay Wadettiwar,Baramati Election

स्वरुपानंदांच्या भूमिकेवर ठरणार निवडणूक

स्वरुपानंद देशमुख यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्यामुळे बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वरुपानंद यांनी गावकरी विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत. यात बाहेरच्या लोकांचाही हस्तक्षेप आहे, असा आरोप करत आपण कुठल्याही परिस्थिती माघार घेणार नसल्याचे सांगितले आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते माघार घेतात की अर्ज कायम ठेवतात? यावरच मस्साजोगचा सरपंच निवडणुकीतून निवडला जाणार की बिनविरोध हे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com