Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या तीन वर्षाच्या काळात राज्यात भ्रष्टाचाराचा महापूर! भाजपाचीही त्याला मूकसंमती..

Ambadas Danve alleges that during three years of Eknath Shinde’s leadership, Maharashtra witnessed rampant corruption : शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले. नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ पण त्यांच्या गद्दारीत आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारीत फरक होता. शिंदे यांनी शिवसेना संपवण्याचा विचार केला.

Jagdish Pansare

दीपा कदम

Shivsena UBT News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना फुटली. चाळीस आमदारांसह शिंदे भाजपाला जावून मिळाले. याचे बक्षिस म्हणून शिंदे यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्री पदाची माळ पडली. एकनाथ शिंदे यांच्या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात लचके तोडले गेले, भ्रष्टाचाराचा महापूरच आला, अशी परिस्थिती होती. विशेष म्हणजे भाजपाची याला मूकसंमती होती, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

महाराष्ट्राला लुटण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले गेले, राज्याच्या संकल्पनेलाच छेद देण्याचे काम शिंदेच्या काळात झाल्याचा दावाही दानवे (Ambadas Danve) यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत केला. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले. नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ पण त्यांच्या गद्दारीत आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारीत फरक होता. शिंदे यांनी शिवसेना संपवण्याचा विचार केला, जो इतरांनी केला नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या चित्रपटातील 'गद्दारीला क्षमा नाही' या संवादाची दानवे यांनी आठवण करून दिली.

पण आता आम्ही या गोष्टीचा विचार न करता आमचा पक्ष, संघटना कशी मजबूत होईल, याकडे लक्ष देत आहोत, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत स्वतंत्र आहे. शिंदे हे अनेकदा आपल्याच निर्णयाला छेद देतात. सकाळी एका पत्रावर, दुपारी त्याच विषयावरील दुसर्‍या अन् संध्याकाळी या दोन्ही पत्रांना रद्द करणाऱ्या तिसऱ्या पत्रावर स्वाक्षरी करतील. अशी अनेक उदाहरणं आम्ही जवळून पाहीली आहेत.

या उलट देवेंद्र फडणवीस सांभाळून विचार करून काम करतात. खरतरं दोघांच्या काळात लुटालूट व्हायची. पण शिंदेची दिसायची आणि फडणवीसांची दिसत नाही. पण हे दोघेही लुटारूच आहेत, असा घणाघातही अंबादास दानवे यांनी केला. मराठवाड्यात शिवसेनेला चांगले दिवस आहेत. लोकसभेला आम्ही चार जागा लढलो, त्यापैकी तीन जिंकलो. एक छत्रपती संभाजीनगरची जागा हमी हरलो. तिथे योग्य विचार झाला असता तर जी जागाही जिंकलो असतो.

मराठवाड्यात शिवसेना भक्कम..

मराठवाड्यातील शिवसेनेची ताकद आजही कायम आहे. जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशीव या चार पाच जिल्ह्यात आजही शिवसेनेची ताकद आहे. आमच्या आंदोलनाला आजही पुर्वीसारखाच प्रतिसाद मिळतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनातून हे दिसून आले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देवू, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT