Ambadas Danve News : हे भारिये.. मंगलप्रभात लोढा यांच्या खात्यातील 41 जणांची पदोन्नती अन् तिथेच पुन्हा नेमणूक!

Lodha Faces Allegations in Skill Dept Transfers: Danve Demands Probe : कौशल्य विकास आयुक्तालयामार्फत वरिष्ठ लिपिक पदावरून कनिष्ठ रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी या पदावर पदोन्नती देताना करोडो रुपयांचा घोटाळा.
Ambadas Danve Reaction News
Ambadas Danve Reaction NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : कौशल्य विकास आयुक्तालयामार्फत 6 जुलै, 2025 रोजी विभागातील वरिष्ठ लिपिक पदावरून कनिष्ठ रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी या पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 42 अधिकाऱ्यांना पदोन्नत्ती देताना मोठया प्रमाणात अनियमितता, आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.

महायुतीच्या मंत्र्याच्या कारभाराच्या एक एक सुरस कथा बाहेर आल्या आहेत.आज अजून एक कथा सांगतो! बदल्यांमध्ये कसे 'कौशल्य' वापरले जाते पहा. मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या खात्यातील 41 जणांची पदोन्नती झाली. आणि आश्चर्य म्हणजे या सर्वांना तिथेच परत पोस्टिंग मिळाली जिथे ते पदोन्नतीपूर्वी कार्यरत होते.

या यादीत 23 व्या क्रमांकावर दिपक भोळसे या कर्मचाऱ्याला त्याच्या दिव्यांगत्वाबाबत नोटीस देण्यात आली आहे. असे असताना प्रमोशन अन् तिथेच पुन्हा नेमणूक.. हे भारिये..!, अशी खोचक प्रतिक्रिया अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एक्सवर दिली. कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत.. तूर्तास भोळसे यांना दिलेली नोटीस पहा, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

Ambadas Danve Reaction News
Ambadas Danve News : रम्मी खेळा, मारामारी करा, हाॅटेल घ्या! राज्याचे कारभारी फक्त नाराजी व्यक्त करणार!

या आधी महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय शून्य आहे याचे उदाहरण देत अंबादास दानवे यांनी'बेस्ट'च्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्याची मुख्यमंत्री आणि दिल्ली वाऱ्या करणारे उपमुख्यमंत्री यांच्या विभागांची ही चढाओढ. तीन लोक एकमेकांत समन्वय साधू शकत नसतील तर 11 कोटी जनतेचे कोणते कल्याण हे करतील? असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला होता.

Ambadas Danve Reaction News
Shivsena- BJP : शिंदेंचे दोन आमदार माझ्या टार्गेटवर, त्यांची मस्ती जिरवायची आहे', भाजप आमदाराचा खुलेआम इशारा

दरम्यान, कौशल्य विकास आयुक्तालयामार्फत वरिष्ठ लिपिक पदावरून कनिष्ठ रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी या पदावर पदोन्नती देताना करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून अपात्र कर्मचाऱ्यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे. एकूण 44 अधिकाऱ्यांपैकी 43 जणांना याच विभागात पदस्थापना देण्यात आल्याचा दावा अंबादास दानवे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पाठवलेल्या पत्रात केला. 31 अधिकाऱ्यांना त्याच जिल्ह्यात पदस्थापना देण्यात आली आहे. तर 28 अधिकाऱ्यांना कार्यरत असलेल्या कार्यालयातच पदोन्नती देण्यात आली असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

Ambadas Danve Reaction News
Mumbai BJP President : ठाकरे बंधूंच्या युतीचा मोठा धसका; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार?

यामध्ये आयुक्त, कौशल्य विकास व उपायुक्त, कोकण भवन यांचा सहभाग असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची बाब अंबादास दानवे यांनी पत्रात अधोरेखित केली. सर्व पदोन्नतीबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशीच्या अनुषंगाने दोषी असलेल्या आयुक्त, कौशल्य विकास व उपायुक्त, कोकण भवन यांचे निलंबन करुन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com