Shivsena Leader Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire On Thackeray : ठाकरे बंधू एकत्र आले, तर चिंधे-मिंधे महाराष्ट्रातून गायब होतील!

Shiv Sena leader Chandrakant Khaire took a sharp dig, stating that traitors will vanish if Uddhav and Raj Thackeray come together. : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडकी बहिण योजनेचा निधी वाढवणार, असे सरकारने जाहीर केले होते. अशा अनेक घोषणा सरकारने पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आम्ही या विरोधात सातत्याने आवाज उठवणार.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले पाहिजेत, अशी सगळ्यांची इच्छा आहे. शेवटी निर्णय दोन भावांनी घ्यायचा आहे. पण हे दोघे एकत्र आले तर चिंधे-मिंधे महाराष्ट्रातून गायब होतील, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला. लातूरात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभी करून अनेक वर्षे झाली. पण अद्याप एकही बोगी इथून बाहेर पडली नाही ती कधी बाहेर येणार? असा सवालही खैरे यांनी भाजप नेत्यांना केला.

नुसत्याच घोषणा करणाऱ्या सरकारला रेल्वे कोच फॅक्टरीचा विसर पडला आहे, असे सांगत खैरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दंड थोपटले. संघटनात्मक बांधणीसाठी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या शाखा स्थापन करत खैरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागा, आपल्याला निश्चित यश मिळेल, असा विश्वास दिला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडकी बहिण योजनेचा निधी वाढवणार, असे सरकारने जाहीर केले होते. अशा अनेक घोषणा सरकारने पूर्ण केल्या नाहीत. (Latur) त्यामुळे आम्ही या विरोधात सातत्याने आवाज उठवणार आहोत. लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या अन्य अनेक योजना बंद पडल्या आहेत. मंत्र्यांचा, आमदारांचा निधी बंद झाला आहे. त्यामुळे सरकारमधील तीनही पक्षांचे एकमेकांत भांडणे सुरू झाली आहेत.

त्यांच्यात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे आमच्या पक्षातून फुटून गेलेले आता परत येण्यासाठी उत्सुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी एकत्र यावे, असे आम्हाला वाटते. याबाबतचा अंतिम निर्णय दोन भावांना घ्यायचा आहे. खरंतर ठाकरे बंधुंनी एकत्र यावे, असे सबंध महाराष्ट्राला वाटते. त्यामुळे आम्ही हात पुढे केलेला आहे.

ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचे चित्र बदलेले आणि चिंधे-मिंधे गायब झालेले दिसतील. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यातील काही लोक आज आमच्या विरोधात जावून सत्तेत बसले आहेत, अशी टीकाही खैरे यांनी केली. आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत पूर्ण जागा लढवण्याची तयारी आम्ही करीत आहोत. आघाडीचा निर्णय झालाच तर एकत्रित निवडणूकांना सामोरे जाऊ, असेही खैरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT