Satish Bhosale Sarkarnama
मराठवाडा

Satish Bhosale : "खोक्या नव्हे, आमचा विठ्ठल"; सतीश भोसलेवरील कारवाई विरोधात आदिवासी समाज आक्रमक, रास्ता रोको करत केली 'ही' मोठी मागणी

Satish Bhosale criminal cases : भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याची 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याने शिरूरमधील दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या पितापुत्राला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

Jagdish Patil

Dharashiv News, 23 Mar : भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याची 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याने शिरूरमधील दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या पितापुत्राला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

त्यामुळे पोलिसांनी (Police) त्याला थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक केली. तर त्याने वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करत बांधलेल्या अनधिकृत घरावर वनविभागाने बुलडोझर चालवला होता. तर आपल्या कार्यकर्त्याचं घर पाडल्याचं समजताच सुरेश धसांनी (Suresh Dhas) त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

त्यानंतर त्यांनी वनविभागाने खोक्याच्या घरावर कारवाई करायला अतिघाई केल्याचंही म्हटलं होतं. अशातच आता खोक्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या समर्थनात तुळजापुरात आदिवासी समाज आक्रमक झाला असून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला आहे.

यावेळी आंदोलकांनी सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल आहे. अनेक तरुणांनी आपल्या हातावर सतीश भोसले आमचा विठ्ठल लिहिलेलं टॅटू काढले आहेत. पण सध्या त्याची प्रतिमा चुकीची दाखवली जात असल्याचा आरोप केला. तर यावेळी रास्ता रोको केलेल्या आदिवासी समाजातील आंदोलकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

तसंच सतीश भोसलेचा जातीवाचक उल्लेख करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याच्या कुटुंबियांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली. शिवाय केवळ राजकीय हेतुने सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

शिवाय केवळ राजकीय हेतुने सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. दरम्यान, आदिवासी समाज खोक्याच्या समर्थनार्थ रस्तायवर आला असता तरी सोशल मीडियावर खोक्याने पैशासोबत मस्ती केलेले तसेच मारहाण केलेले व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शिवाय सतीश भोसलेविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये मारहाण, प्राणघातक हल्ला, फसवणूक असे विविध गुन्हे आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT