Devendra fadnavis Politics: मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे पंख कापले? आता सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण!

Devendra Fadnavis;Nashik's Kumbh Mela will be as strong as Prayagraj's-नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पाहणीसह कामकाज आणि विकास आराखड्याचा आढावा घेतला. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. विविध विकास कामांचा आराखडा आणि कामांवर बैठकीत चर्चा केली. गोदावरी स्वच्छता आणि मंदिरांच्या सुधारणांची कामे होतील.

Devendra Fadanvis
Devendra fadnavis Politics: देवेंद्र फडणवीसांवर साधू खुश, म्हणाले, तुम्हीच व्हा कुंभमेळ्याचे कारभारी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय प्राधिकरण निर्माण केले जाईल, असे स्पष्ट केले. या प्राधिकरणामार्फत सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व कामे होणार आहेत. विशेषतः बांधकाम आणि रस्त्यांसह नाशिक शहराच्या विकासातील मूलभूत कामांचाही त्यात समावेश असेल.

Devendra Fadanvis
Sanjay Shirsat : जयंतरावांची अस्वस्थता कधी दूर होणार? मंत्री शिरसाठांनी 'टायमिंग' सांगत दिली खळबळ उडवून

या निमित्ताने कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मूलभूत सुधारणांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. सिंहस्थ कुंभमेळा कायदा आणि प्राधिकरण हा देशातील कुंभमेळा साजरा करण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावतात नाशिक त्याला अपवाद होते. या निमित्ताने आता सिंहस्थ कुंभमेळा कायदा अस्तित्वात येणार असल्याने शहराच्या मूलभूत विकासाला चालना मिळेल.

मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा महापालिका आणि जिल्हा परिषदेसह स्मार्ट सिटी प्रकल्पालाही धक्का देणारा ठरला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व कामे प्राधिकरण करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंख कापले, असेच म्हणता येईल.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहराचा विकास होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्रंबकेश्वर साठी अकराशे कोटी रुपयांचा आराखडा या निमित्ताने तयार करण्यात आला आहे. शासनाकडून कुंभमेळ्यात प्राधान्याने गोदावरी स्वच्छता आणि मंदिरे गोदावरीतील कुंड पार्किंग आदींचे रिस्टोरेशन समाविष्ट आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची यापूर्वीच सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. श्री महाजन २०१५ च्या कुंभमेळ्यात देखील मंत्री होते. त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा कायदा आणि प्राधिकरण दोन्हींची घोषणा केली होती बारा वर्षांनी ही घोषणा प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात सर्व आखाड्यांच्या प्रतिनिधी साधूनी विविध सूचना केल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहूल आहेर, हिरामण खोसकर, विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांसह विविध लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com