Dharashiv News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली. तुळजाभवानी मंदिराचे काम देखील सुरु झाले आहे. पुढच्या दोन वर्षात काम पूर्ण होईल. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. विकास आराखडयास मान्यता दिली असून त्यासोबतच आम्ही त्यासाठी तात्काळ पैसे रिलीज करत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
21 महिन्यानंतर तुळजापुरात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शनिवारी सकाळी पहिल्यांदा तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यांनतर मंदिराची पाहणी करून तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखाड्याबाबतचा आढावा घेतला. यावेळी विकास आराखड्यालाही त्यांनी मान्यता दिली.
आई तुळजा भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य आणले. त्या पध्दतीने राज्यकारभार चालावा असे अपेक्षित आहे. तसाच कारभार चालावा, असे साकडे देवी चरणी घातले असून आईने आम्हाला आशीर्वाद द्यावा, अशी आई चरणी प्रार्थना केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवराय हे आमचे आराध्यदैवत आहेत आणि छत्रपती शिवरायांचा मान, सन्मान, स्वाभिमान रहावा या करिता,जे लागेल ते करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करणार
तुळजाभवानी मंदिर समितीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये तुळजापूर विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. यावेळी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक अरविंद बोळंगे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, तुळजापूर विकास आराखड्याला सरकारने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल असे ते म्हणाले. विकास आराखडा राबवताना एकूण 73 एकर भूसंपादनाची गरज असल्याचे तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी 1866 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला.
तुळजापुरात दाखल होताच त्यांचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, अनिल काळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.