BJP state president election: शिस्तप्रिय भाजपला 'त्या' अलिखित नियमाचा विसर ? मंत्रिमंडळात समावेश अन् मुदत संपल्यानंतरही प्रदेशाध्यक्षपदाची निवड 'वेटिंग'वरच...!

Maharashtra BJP leadership News : राज्यातील नवीन प्रदेशाध्यक्षासह तब्बल 78 जिल्हाप्रमुख निवडले जाणार आहेत. त्यासाठी 15 मार्चचा मुहूर्तही ठरला होता.
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात प्रदेश कार्यकारिणीमध्ये सुद्धा मोठे फेरबदल केले जाणार आहेत. राज्यातील नवीन प्रदेशाध्यक्षासह तब्बल 78 जिल्हाप्रमुख निवडले जाणार आहेत. त्यासाठी 15 मार्चचा मुहूर्तही ठरला होता. मात्र, नवीन प्रदेशाध्यक्ष निवड संघटनात्मक निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या आहेत. येत्या काळात बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला असून त्यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून येत्या काळात रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली जाणार असून त्याची औपचारिक घोषणा अद्याप बाकी आहे.

भाजपचा (Bjp) विस्तार आणि 2029 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाची मूळ संघटना आणि इतर मोर्चा आणि पक्षातील सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले असून महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक जणांना भाजपशी जोडण्याचे लक्ष देण्यात आले होते.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Kunal Kamra Breaking : शिवसैनिकांच्या धमक्यांनी कुणाल कामरा धास्तावला; मद्रास हायकोर्टाकडे केली मोठी मागणी

राज्यातील विधानसभा निवडणुका होताच भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणीचे पदाधिकाऱ्यांना टार्गेट दिले होते. 1 ते 20 जानेवारीपर्यंत एक कोटी सदस्य नोंदणीचे अभियान राबविण्यात येणार होते. 1 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या संघटन पर्व या अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी जणांना भाजपसोबत जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले होते. या दृष्टीने भाजपचे नेते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Vijay Shivtare : शिवतारेंनी टोचले शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान; ‘पुरंदरमध्ये झालं; पुण्यात करून दाखवा’

त्यानंतर सदस्य नोंदणीसाठी 30 जानेवारीची मुदत देण्यात आली तर त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, हे टार्गेट पूर्ण करण्यास अडचणी येत होत्या. महाराष्ट्र भाजपने आतापर्यंत तब्बल 1 कोटी 44 लाख सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये आणखी सहा लाख सदस्य नोंदणी करून 1 कोटी 50 लाखांपर्यंत सदस्य संख्या नेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Maharashtra BJP Target : महाराष्ट्र भाजप 'टार्गेटच्या' जवळ; सहा दिवसात करणार ऐतिहासिक कामगिरी

त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही सदस्य नोंदणी पूर्ण होणार आहे. त्यानंतरच्या काळात राज्यभरात साधरणतः 1 लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणार आहे. एका बुथमध्ये जवळपास 12 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बूथ प्रमुखाच्या नियुक्तीसाठी दोन निवडणूक प्रमुखाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांच्या नियुक्त्या आठवडाभरात पूर्ण केल्या जाणार आहेत.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Bjp News : मुस्लिमांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केली भाजपची भूमिका स्पष्ट; म्हणाले, 'विरोधात...'

त्यानंतर साधारण पुढील पंधरा दिवसात म्हणजेच 15 एप्रिलच्या दरम्यान भाजप तालुकाध्याक्षाची नियुक्ती केली जाणार आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर तालुका कार्यकारिणी जाहीर होणार आहे. त्यानंतरच्या काळात साधारण 15 ते 30 एप्रिलच्या दरम्यान जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकारणी निवडली जाणार आहे. या सर्व भाजपमधील संघटनात्मक निवडणुका 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Ajit Pawar : 'अधिवेशनात पाच दहा मिनिटे हजेरी लावल्याने...'; अजितदादांनी उद्धव ठाकरेंच सगळंच काढलं

15 मे पर्यंत मिळणार भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष?

त्यानंतर मे महिन्यात म्हणजेच साधारणतः 15 मे पर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 15 मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार होता. मात्र, सदस्य नोंदणीनंतरच्या संघटनात्मक निवडीला वेळ लागणार असल्याने प्रदेशाध्यक्षाची निवड लांबणीवर पडली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
BJP Vs Uddhav Thackeray: ठाकरेंची 'सौगात-ए-मोदी'वरुनची टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी; बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com