MNS Vs Shivsena: बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून रंगला वाद; मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपली

Thackeray Photo Controversy News : महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे सेना- मनसेमध्ये जुंपली असून टीका-टिपण्णीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा व चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकाची तयारी सर्वच पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये मनसे स्वबळावर लढणार की कोणासोबत युती करणार याचा निर्णय झालेला नाही.

एकीकडे राज्यात औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा, दिशा सालियान हे विषय गाजत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच मनसेने दादर शिवाजी पार्क भागात गुढी पाडवा मेळाव्याचे एक पोस्टर लावले आहे. त्यावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेवर टीका केल्याने आता ठाकरे सेना- मनसेमध्ये जुंपली असून त्यावरून महापालिका निवडणुकीपूर्वीच टीका-टिपण्णीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे.

2006 साली राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतःच्या पक्षाची घोषणा केली. त्यावेळेसपासून मनसे व शिवसेनेत आडवा विस्तवही जात नाही. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या सुरुवातीच्या काही निवडणुकीत मोठे यश मिळाले. मात्र, त्यानंतर मनसेच्या पदरी अपयश आले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
BJP : भाजपची दणक्यात सदस्य नोंदणी, दीड कोटींकडे वाटचाल; पडद्यामागून माधवी नाईक यांनी हलवली सूत्र

आगामी काळात होत असलेल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच आता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पोस्टरवर मनसेने फोटो लावला असल्याने ठाकरे सेना- मनसेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
BJP state president election: शिस्तप्रिय भाजपला 'त्या' अलिखित नियमाचा विसर ? मंत्रिमंडळात समावेश अन् मुदत संपल्यानंतरही प्रदेशाध्यक्षपदाची निवड 'वेटिंग'वरच...!

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो आहे, त्या विषयी उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही हेच त्यातून दिसतं आहे. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. त्या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता. त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Tanaji Sawant controversy : तानाजी सावंतांच्या मागील अडचणी संपेनात; विरोधकांनी गाठले खिंडीत, आता फैसला कोर्टात!

त्यानंतर मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्यात आले. माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंगवर लावणे हे पक्षाचे धोरण नाही. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते, पण उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, महापौर बंगला घशात घालायचा होता, तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय ? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. त्यामुळे येत्या काळात या पोस्टरवरून रंगलेल्या वादात भरच पडण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट, तत्कालीन गृहमंत्र्यांनी केला मोठा दावा; म्हणाले, 'क्लोजर रिपोर्ट दिल्याने....'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या 30 तारखेला रविवारी गुढी पाडवा मेळावा आहे. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात या दिवशी मनसेची मोठी सभा होते. यंदा सुद्धा गुढी पाडवा मेळाव्याला राज ठाकरेंच भाषण होणार आहे. राज ठाकरे भाषणात काय बोलतात? विरोधकांचा कसा समाचार घेतात? याची उत्सुकता आहे.

त्यातच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या लावण्यात आलेल्या पोस्टरवरील फोटोवरून काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. या विषयवर राज ठाकरे काय बोलतात का? त्यांची भूमिका काय असणार? मनसेची भविष्याची दिशा काय असणार? ते राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होईल. मात्र, त्यासाठी आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याची वाट पाहवी लागणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Ajit Pawar : 'आता नकोसं झालंय', 1000 कोटींचा निधी दिलाय, नुसते फोटो काढून...'; अजितदादांचा भर स्टेजवर संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com