MP Omprakash Rajenimbalkar  sarkarnama
मराठवाडा

Om Rajenimbalkar : तुळजापूर ड्रग्ज तस्करप्रकरण संसदेत गाजणार; चौकशीसाठी ओम राजेनिंबाळकरांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Tuljapur drugs smuggling News : येत्या काळात तुळजापूर, धाराशिव येथील ड्रग्ज तस्कर प्रकरणाचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : तुळजापूर ड्रग्ज तस्कर प्रकरणाचा तपास तातडीने व्हावा, यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या काळात तुळजापूर, धाराशिव येथील ड्रग्ज तस्कर प्रकरणाचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहले आहे.

तुळजापूर तालुक्यातील ड्रग्ज तस्कर प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून त्यामध्ये आपण लक्ष घालून हे प्रकरण वॉर रूममध्ये घ्या व या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

त्यासोबतच तुळजापूर ड्रग्ज तस्कर प्रकरणात भाजपचे अनेक कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आता खासदार ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रकरणी काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यासोबतच येत्या काळात ड्रग्ज तस्कर प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदार ओम राजेनिंबाळकर हे भेट घेणार आहेत. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी ते करणार आहेत. ड्रग्ज तस्करी हा राजकीय विषय नाही. भावी पिढी वाचवायची असेल तर या मुद्द्यावर सर्वानी एकत्र येऊन माहिती पोलिसाना दिली पाहिजे, असे आव्हान खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केले आहे. त्यासोबतच या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणीही दबाव आणू नये, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणात पोलीस यंत्रणेने आतापर्यंत काय तपास केला आहे. या प्रकरणात पोलिसानी आजवर केलेल्या तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे मागीतला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण संसदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाईकडे लागले सर्वांचे लक्ष

धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी सुरु आहे. त्यासोबतच ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची होणारी वाहतूक व विक्री यावर बंदोबस्त करण्यासाठी व गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तपास व भविष्यात उपाय योजना करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT