Eknath Shinde Politics: ठाकरेंच्या नेत्यांनं महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारा बॉम्ब टाकला; दिल्लीत पहाटेच्यावेळी शिंदेंची काँग्रेस नेत्यांशी...

Eknath Shinde And Congress : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री व कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंविषयी गौप्यस्फोट केला आहे. तसेच नाना पटोलेंच्या ऑफरवरही रोखठोक भाष्य केलं आहे.
Eknath shinde
Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी धुळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण तापवलं होतं. त्यांनी थेट महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये यावं,त्यांना आम्ही मुख्यमंत्री करु असंही पटोले यांनी सांगितलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पटोलेंच्या याच ऑफरवर तिखट प्रतिक्रिया देतानाच शिंदेंविषयी एक खळबळजनक दावा केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता.15)माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री व कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंविषयी गौप्यस्फोट केला आहे. तसेच नाना पटोलेंच्या ऑफरवरही रोखठोक भाष्य केलं आहे.राऊत म्हणाले,नाना पटोलेंची ही ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो.ते आमचे सहकारी असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे,असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

तसेच राजकारणात काहीही अशक्य नसतं.सर्व शक्यता असतात.नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असंही राऊत यावेळी म्हणाले. पण एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी आमचा काहीही संबंध नाही.त्यांचा भाजपशी संबंध आहे.ते भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत.एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे.तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असल्याचं सांगत शिंदेंसह अजित पवारांनाही टोला लगावला.

Eknath shinde
Satish Wagh Murder : मांत्रिकाचा जादूटोणा, पवनला सुपारी; पत्नी मोहिनीचं वर्षभराचं प्लॅनिंग...

एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा. आता अहमद पटेल हयात नाहीत. पण शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असं विधान करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

हे सरकार खोक्या बोक्याच्या मागे लागले आहेत. पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार ? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी.बुलढाण्यातील कैलास या शेतकऱ्याला कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.कृषिमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे.

Eknath shinde
Karad : दक्षिणेतील उंडाळकरांच्या पक्षांतराचे उत्तरेत धक्के; 'सह्याद्री'त सत्तांतराचा भूकंप होणार?

पण महायुतीचं सरकार ढोंगी आणि दुतोंडी आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, आत्महत्येवर तोंड उघडत नाही. पण ही केवळ कैलासची आत्महत्या नव्हे तर सर्व शेतकऱ्यांची आत्महत्या असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा,याचा खुलासा करावा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. याचवेळी हे सरकार खोक्या बोक्याच्या मागे लागले आहेत.मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार ?मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, अशा शब्दांत राऊतांनी टीकेची झोड उठवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com