Shivsena News : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. अशातच आता आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना वादग्रस्त आणि बेताल वक्तव्ये टाळा, कामावर लक्ष केंद्रित करा आणि विरोधकांच्या आरोपांना कृतीतून उत्तर द्या, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याचदरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. या दरम्यान, त्यांनी शिवसेना संघटनबांधणीचा आढावा घेतला. यावेळी सामंत यांनी शिवसेनेची कार्यकारिणी नेमताना नवे ॲक्टिव्ह पदाधिकारी नियुक्त करा. गटप्रमुखांपर्यंत संघटना मजबूत करा. तसेच या माध्यमातून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे करत असलेले विकासकार्य लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा आढावा सामंत यांनी घेतला. माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, मराठवाडा सचिव ॲड. अशोक पटवर्धन, आमदार विलास भुमरे, संजना जाधव,प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आदींची यावेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, मतदारसंघनिहाय विविध मुद्द्यांवर आढावा घेत सद्यस्थिती शिवसेना (Shivsena) नेत्यानी जाणून घेतली. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. लोकसभा विधानसभेत तुम्ही शिवसेनेचा झेंडा रोवला आता तुमच्यासाठी नेते मैदानात उतरतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जिंकण्यासाठी गाव शाखेपर्यंत संघटनात्मक बांधणी पूर्ण करा. कार्यकारिणी नेमताना नवे ॲक्टिव्ह पदाधिकारी नेमा. गटप्रमुखांपर्यंतचे संघटना मजबूत करा. त्या माध्यमातून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे करत असलेले विकासकार्य लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहनही मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना यावेळी केले.
उद्योगमंत्री उदय सामंत छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. या दरम्यान, त्यांनी शिवसेना संघटन बांधणीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित करून आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षासह विरोधकांना सामंत यांनी सुनावले. ईव्हीएममध्ये कुठलाही घोळ नाही हे वारंवार सांगितले गेले. निवडणूक आयोगानेही या संदर्भात खुलासा केला आहे. मात्र तरीही विरोधकांचे समाधान होत नसेल तर त्यांनी खुशाल राजीनामा देऊन नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, असे सामंत म्हणाले.
उदय सामंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीत लढणार आणि जिंकणार, असा दावा केला. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन मालकाला भेटले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. यावर दिल्लीला पंचपक्वान्न खायला कोण गेले? राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्राचे भले करू शकत नाहीत, अशी टीका सामंत यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.