
थोडक्यात बातमी:
गोकुळ अध्यक्षपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीत दावा प्रतिदावा:
अध्यक्ष कोणाचा हे सांगताना दोन्ही गटांनी आपापल्या नेत्यांचा विजय असल्याचे सांगितले.
ठाकरे गटाचे गोकुळ प्रशासनावर गंभीर आरोप:
3.74 कोटींची खरेदी निविदेशिवाय कोटेशनवर झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून.
कलम ८८ अंतर्गत कारवाईची मागणी:
पशुखाद्य आणि इतर गैरव्यवहारांबाबत चौकशी करत संचालक मंडळावर कारवाईची मागणी केली.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून झालेल्या चर्चेनंतर गोकुळ राज्याच्या केंद्रस्थानी आला. अध्यक्ष महाविकास आघाडीचा की महायुतीचा यावरून संचालक अध्यक्ष, नेते आणि मुख्यमंत्री यांच्यात स्पर्धा सुरू झाली. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी गोकुळ दूध संघावर (Gokul Dudh Sangh) अध्यक्ष हा आघाडीचा झाला.असा दावा केला आहे. त्यातच आता गोकुळ दूध संघात ठाकरेंची शिवसेना एकाकी पडल्यानंतर गोकुळ दूध संघातील संचालक आणि प्रशासनावर गैरव्यवहाराचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. (Gokul Dudh Sangh faces serious corruption allegations just two months after the chairman election, raising questions about financial transparency and governance in Maharashtra’s leading dairy cooperative)
हीरक महोत्सवानिमित्त खरेदी करण्यात आलेल्या जाजम आणि घड्याळाची खरेदी ही निविदा न काढता कोटेशन नुसार तब्बल 3 कोटी 74 लाखांची खरेदी केली आहे. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला.
खरेदीसह पशुखाद्य वाहतुकीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संचालक मंडळावर कलम 88 नुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी गोकुळ दूध संघ प्रशासनाकडे केली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे (Uddhav Thackeray) उपनेते संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची भेट घेतली.
गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या घामावर हा गोकुळ दूध संघ उभा आहे. मागील वेळी पशुखाद्य आहार मध्ये गैरव्यवहार झाला. तो संचालकांनी आपापसांत मिटविला. यातील छोट्या माशांवर कारवाई केली, त्यावेळीच जबाबदार व्यक्तीवर कारवाई झाली असती तर असे धाडस केले नसते.
आता‘ गोकुळ’ने पावणे चार कोटींची खरेदी केवळ कोटेशनवर कशी केली ? त्याला संचालक मंडळ जबाबदार असून, याविरोधात आम्ही कारवाईची मागणी करणार आहे.मागणीचे निवेदन कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांना दिले.
Q1: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून कोणते राजकारण सुरू आहे?
महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही अध्यक्षपदावर आपला दावा करत आहेत.
Q2: ठाकरे गटाने कोणते आरोप केले आहेत?
गैरव्यवहार करून कोटेशनवर तब्बल 3.74 कोटींची खरेदी केल्याचा आरोप केला आहे.
Q3: ठाकरे गटाची प्रशासनाकडे मुख्य मागणी काय आहे?
कलम ८८ नुसार चौकशी करून दोषी संचालकांवर कारवाई करण्याची मागणी.
Q4: गोकुळ दूध संघ कोणाच्या मालकीचा आहे?
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी संस्था आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.