Udayanraje & Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Udayanraje & Pankaja Munde : पंकजाताईंना दिलेला शब्द उदयनराजे पाळणार; राजीनामा देणार का?

Beed Lok Sabha Election 2024 Result : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईल मध्ये कॉलर उडवून ही प्रचार सभा नाही तर विजयी सभा आहे, असा विश्वास व्यक्त करत ‘तुम्हाला वाकून नमस्कार करतो, परंतु माझी भगिनी पंकजा मुंडेला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले होते.

Datta Deshmukh

Beed Political News : 'तुम्हाला माझ्या गळ्याची अन् छत्रपती शिवरायांची शपथ आहे, पंकजा मुंडेंना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करा. पंकजा मुंडे तुमची मुलगी, बहीण आहे. तिला मतदान करायचे नाही तर कोणाला करायचे? माझी भगिनी पंकजा मुंडेला आता संधी मिळाली आहे. तिला येत्या 13 तारखेला भरघोस मतदान करून विजयी करा. स्थिर सरकार सत्तेवर असते त्यावेळीच आपल्या भागाचा विकास होत असतो. तुम्ही सर्वजण सज्ञान आहात, त्यामुळे कृपा करून माझ्या भगिनी पंकजा मुंडेला निवडून द्या; अन्यथा मी राजीनामा देतो आणि पंकजा मुंडेंना तिकडून निवडून आणतो,' असा शब्द खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बीडच्या सभेत दिला होता.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव करुन सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झालेले आहेत. आता छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आपला शब्द पाळून राजीनामा देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात काट्याची लढत झाली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही प्रचाराच्या अंतिम दिवशी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात आले होते. उदयनराजे यांनी कडा (ता. आष्टी), युसूफवडगाव (ता. केज) येथे सभा घेत परळीत पंकजा मुंडेंच्या प्रचाराच्या समारोपाची सभाही घेतली. कडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतील सभेवेळी पंकजा मुंडेंना निवडून देण्याचे आवाहन करत उदयनराजेंनी भावनिक साद घातली होती.

त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये कॉलर उडवून ही प्रचार सभा नाही तर विजयी सभा आहे, असा विश्वास व्यक्त केला होता. ‘तुम्हाला वाकून नमस्कार करतो, परंतु माझी भगिनी पंकजा मुंडेला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले होते. त्यावेळी ते राज्यसभेचे खासदार होते. आता ते साताऱ्यातून निवडून आले आहेत. आता उदयनराजेंनी राजीनामा दिला तर भाजपच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा रिक्त होणार आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर उदयराजेंच्या शब्दाची आता चर्चा सुरू झाली आहे.

तुम्हाला माझ्या गळ्याची अन् छत्रपती शिवरायांची शपथ आहे, पंकजा मुंडेंना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करा. पंकजा मुंडे तुमची मुलगी, बहीण, आहे. तिला मतदान करायचे नाही तर कोणाला करायचे? माझी भगिनी पंकजा मुंडेला आता संधी मिळाली आहे, तिला भरघोस मतदान करून विजयी करा. स्थिर सरकार सत्तेवर असते त्यावेळीच आपल्या भागाचा विकास होत असतो. तुम्ही सर्वजण सज्ञान आहात, त्यामुळे कृपा करून माझ्या भगिनी पंकजा मुंडेला निवडून द्या, अन्यथा मी राजीनामा देतो आणि पंकजा मुंडेंना तिकडून निवडून आणतो, असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले होते. आता उदयनराजे भोसले आपला शब्द पाळत राजीनामा देतात का, हे पहावे लागेल.

दरम्यान, याच सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे होते. मराठवाड्याचे ते दैवत होते. जनतेच्या न्याय हक्कासाठी पंकजा मुंडे या कायम भूमिका घेऊन लढत असतात. पंकजा गोपीनाथ मुंडे दिवंगत मुंडे यांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करत आहेत. गोपीनाथराव मुंडे यांनी संपूर्ण मराठवाड्याला आपले कुटुंब मानले होते. सर्व जाती, धर्म, उपेक्षित, वंचित बहुजन समाजाला सोबत घेऊन त्यांनी समाजकारण आणि राजकारण केले. मराठवाड्याच्या मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी आणि बीड जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पंतप्रधान मोदी आणि माझे आता छान जमते आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना घेण्याची शिफारस आपण करणार असल्याचे म्हटले होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT