Pankaja Munde : 'माझा पराभव झाला मी स्वीकारला...', निकाला आधीच पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Beed Lok sabha Pankaja Munde Mocks Bajarang Sonawane : मी सत्तेत होते तेव्हा देखील निवडणूक लढवली. तेव्हा मी सत्तेचा दुरउपयोग केला नाही. आता तर मी विरोधात आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Bajrang Sonwane
Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Bajrang SonwaneManoj Jarange Patil, Pankaja Munde, Bajrang Sonwane

Beed Lok sabha 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होते आहे. एक्झिट पोलमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बजरंग सोनवणे यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रँग रुमला भेट दिली. तेथे ते अधिकाऱ्यांवर भडकले. यावरून पंकजा मुंडेंनी Pankaja Munde बजरंग सोनवणेंना डिवचले आहे.

या निवडणुकीत काहीही होऊ शकते. आदळआपट करण्यात काय अर्थ आहे. आपण पाहिलय 2019 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला होता. तो मी स्वीकारला. आता माझा विजय होईल तो ही मी आनंदाने स्वीकारेल. आदळआपट करून काय साध्य करणार, असा टोला पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणे Bajrang Sonwane यांना लगावला.

फक्त बीडमध्येच निवडणूक होत नाही. देशभरात होत आहे. तेथेही कलेक्टर अधिकारी आहेत. मी सत्तेत होते तेव्हा देखील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. तेव्हा मी सत्तेचा दुरउपयोग केला नाही. आता तर मी विरोधात आहे. उमेदवार तेच होते का? या निवडणुकीत त्यावरही प्रश्न चिन्ह आहे, असा खोचक सवाल पंकजा मुंडेंनी Pankaja Munde बजरंग सोनवणेंना विचारला.

Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Bajrang Sonwane
Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखेंची भिस्त आता विठुरायावरच!; एक्झिट पोलनंतर आत्मविश्वास डळमळला?

मी कर्म चांगले केले आहे. ज्या विचारांसाठी मी राजकारणात कोणत्या व्यक्ती विषयी, वर्गाविषयी असन्मानाने बोलले नाही. निवडणूक ज्या प्रकारे झाली त्या परिस्थितीमध्येही मी माझा तोल जावू दिला नाही. कोणाविषयी असन्मानजनक बोलले नाही, याचा मला आनंद आहे. 4 जून नंतर खासदार बदलेल आणि मी खासदार होईल, असा आत्मविश्वास देखील पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.

धडधड वाढली...

पंकजा मुंडेंनी जरी विजयाता आत्मविश्वास व्यक्त केला असला तरी बजरंग सोनवणे यांनी देखील तेच विजयी होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे निकालासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना सोनवणे आणि मुंडेंच्या कार्यकर्त्यांची धडधड वाढली आहे

Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Bajrang Sonwane
Latur Loksabha Exit Poll : बडा ‘ड्रामेबाज’ एक्झिट पोल ; शृंगारे अन् काळगेही जिंकणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com