Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ठाकरेंचा सरकारविरोधात एल्गार; मराठवाडा अनुशेषाचं आंदोलन पेटणार?

Uddhav Thackeray will join the Tumse Na Ho Payega protest : उद्धव ठाकरे १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘तुमसे ना हो पाएगा’ आंदोलनाच्या समारोपात सहभागी होणार असून मराठवाड्याच्या विकास, निधी, पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्याच्या हक्क, अस्तित्व आणि स्वाभिमानासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष वर्षानुवर्षे वाढतच आहे. सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात, प्रत्यक्षात निधी दिला जात नाही, असा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेने आठही जिल्ह्यांमध्ये 'तुमसे ना हो पायेगा' हे जनआंदोलन उभारले होते.

या आंदोलनाचा शेवट १७ सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सरकारला जाब विचारत होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असून यामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः सहभागी होणार आहेत. मराठवाड्याच्या हक्काचा, अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा हा एल्गार असल्याचे शिवसेनेकडून सांगीतले जात आहे.

आश्वासनांची खैरात खूप झाली, घोषणांचे कागदी इमलेही रचून झाले; पण मराठवाड्याच्या पदरात प्रत्यक्षात काय पडले? दुष्काळ, पाणीप्रश्न, शेतकऱ्यांचे हाल आणि रोजगाराचा अनुशेष.या सर्व ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ठणकावून जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. असे दानवे म्हणाले.

'मराठवाड्याचा विकास तुम से ना हो पाएगा' हे मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाचा विराट समारोप छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या लढ्याला धार देण्यासाठी आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी साडेअकरा वाजता मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासाच्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT