Devendra Fadnavis Vinod Tawde Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : तावडे पैसे वाटप प्रकरणानं संधी दिली; त्याक्षणी ठाकरेंनी फडणवीस अन् भाजपचा हिशोब चुकता केला!

Thackeray counters BJP and Fadnavis on Tawde money case: विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली आले. या हॉटेलमधून सुमारे रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच तावडेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल कऱण्यात आला आहे.

Deepak Kulkarni

Tuljapur News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार थांबला अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडींना वेग आला आहे. मतदानाला काही तास बाकी असतानाच विरारमध्ये खळबळजनक घटना घडली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. याप्रकरणी तावडेंसह भाजप आणि महायुती चांगलीच अडचणीत सापडली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वोट जिहादवरुन उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला चांगलंच टार्गेट केलं होतं. त्या फडणवीसांच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर करत ठाकरेंनी विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणावरुन भाजपला धू धू धुतले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता.19) तुळजापूरला जात आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते विनोद तावडेंच्या पैसे वाटपावर रोखठोक भाष्य केलं.

ठाकरे म्हणाले, मी आज तुळजापूरला दर्शनासाठी आलो आहे.त्यावेळी माझी पण बॅग आज तपासण्यात आली. विनोद तावडेंकडे पैसे सापडले अशा बातम्या येताहेत.तर अनिल देशमुखांवर जो दगड मारला तो कोणी शोधायचा? निवडणूक आयोगाने! माझ्याकडे कुठला पुरावा नाही.पण ज्या बातम्या येताहेत, त्यानुसार तो वोट जिहाद असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपसह शिंदे आणि अजित पवारांवरही शा‍ब्दिक हल्ला चढवला.ते म्हणाले, भाजप-शिंदे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? हा भाजपचा नोट जिहाद आहे, पैसा बाटेंगे और जितेंगे असं काहीसं आहे का? त्याचा छडा लागणं गरजेचं आहे.तसेच याप्रकरणी आता कठोर कारवाई व्हायला हवी,असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दांत सोमवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरूनही महायुतीला घेरलं.ते म्हणाले, देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं.त्यानंतर आज पैसे वाटपाचा व्हिडीओ समोर आला हे जादूचे पैसे आले कुठून? कुणाच्या खिशातून जात होते? याची माहिती समोर आली पाहिजे. आणि ज्यांनी हे उघड केलं असेल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण आता कदाचित हे त्यांचं आपापसातील गँगवार असू शकेल. भाजपांतर्गत किंवा मिंदे आणि त्यांच्यातर्गतही असू शकेल ”, अशी शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून 'वोट जिहाद'...'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत असून हे खेदजनक असल्याची टीका प्रचारादरम्यान केली होती. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी कधी बघितले नव्हते. अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावे लागणार असल्याचेही फडणवीस म्हणाले होते.

'...देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप?',अंधारेंचं ट्विट

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विनोद तावडे आणि भाजपवर टीकेची झोड उठवली.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या.मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला, पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप?'अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT