Pratibha Dhanorkar : काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला धमकी, व्हिडीओ व्हायरल

Pratibha Dhanorkar video threatens Kunbi community sparks outrage: वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी झाली. या सभेला खासदार धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkarsarkarnama
Published on
Updated on

Vidarbha News : काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठीमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून कुणबी समाजातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी झाली. या सभेला खासदार धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा धमकीवजा इशारा दिला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खासदार धानोरकर म्हणाल्या, ‘आज जे लोक माझा विरोध करीत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात 2800 गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा आहे.

Pratibha Dhanorkar
Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; म्हणाले, 'मी कोणाच्या बापाचा प्रेशर घेत नाही' पाहा VIDEO

फक्त 300 गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. 20 नोव्हेंबरला मतदान झाले की गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे, असा दमही त्यांनी दिला.

Pratibha Dhanorkar
NCP Sharad Pawar : खळबळजनक! एकापाठोपाठ शरद पवारांचे नेते 'टार्गेट'; देशमुखानंतर 'या' महिला नेत्याच्या पतीवर हल्ला

या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी जोर लावला. यावरून धानोरकर कुटुंबात फूट पडल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com