Uddhav Thackeray Speech Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray Speech : 'न्यायदानात भाजपच्या काळ्या मांजरी आडव्या... न्याय कुणाकडे मागायचा?' ठाकरेंनी डिवचले!

Uddhav Thackeray On Amit Shaha : "2014 मध्ये भाजपने युती तोडली होती. तरीदेखील हिंदुत्वासाठी पुन्हा एकत्र आलो."

Shital Waghmare

Dharashiv News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्य़ा धाराशिव येथील सभेत भाजप, फडणवीस आणि मोदींवर सडकून टीका केली. भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्या सोबतची युती तोडली. त्यानंतरही आम्ही 2019 ला भाजपसोबत गेलो होतो. त्यानंतरही नेहमीच शिवसेनेला संपवण्याची भाषा त्यावेळसपासून भाजपने केली आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला. (Latets Marathi News)

शिवसेना ठाकरे गटाने सत्तासंघर्ष आणि पक्षाची लढाई न्यायालयात लढवली. अजूनही ही लढाई सुरू आहे. याबाबत ठाकरे म्हणाले, "न्यायालायातून एखादा न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा किंवा राज्यपाल देणेही चोरीछुपे चालत होते. पण भाजपच्य राज्यात हे तर उघडपणे चालू आहे. न्यायदानामध्ये भाजपचीही काळी मांजरी असतील तर आपण न्याय मागणार कोणाकडे? असे ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाह आणि मोदींचा फॉर्म भरायला पक्षप्रमुख पाहिजे होता. कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख होय, मी आहे. शिवसेना (Shiv Sena) ही संपत्ती माझी वडिलोपार्जित आहे. शाहा तुमचा अधिकार नाही. तुम्ही माझे खासदार-आमदार चोरून खोक्यामध्ये बसवले, पण शिवसैनिक कसे चोरणार? असा प्रश्न त्यांनी मोदी आणि शाह यांना विचारला.

शिवसेना-भाजप युतीवर भाष्य

ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, "निवडणूक काळात ज्यांनी मदत केली त्यांना ते संपवायला लागले आहेत. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे माझ्या कुटुंबातील सदस्य होते, परंतु मोदी आणि शाह नावाचे कोणी व्यक्ती देशात आणि भाजपत आहेत हेसुद्धा आम्हाला माहीत नव्हते. 2014 मध्ये भाजपने युती तोडली होती. तरीदेखील हिंदुत्वासाठी पुन्हा एकत्र आलो. नातं जपणं ते आमचं हिंदुत्व आहे. जर आम्ही तुम्हाला खांद्यावर घेतलं नसतं, तर तुम्हाला चार खांदेवालेसुद्धा मिळाले नसते.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT