Udgir Municipal Council Election 2025 News Sarkarnama
मराठवाडा

Local Body Election 2025 : उदगीर नगरपालिकेवर कोणाचा झेंडा ? लिंगायत, मुस्लिम मतदार ठरणार निर्णायक!

Local Body Election Udgir : गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला होता. भाजप 19, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 तर एमआयएम 6 असे पक्षीय बलाबल होते.

Jagdish Pansare

  1. उदगीर नगरपालिकेवर सत्ता कोणाची बसणार यावर लक्ष केंद्रित आहे.

  2. लिंगायत आणि मुस्लिम मतदार हे या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील, अशी चिन्हं आहेत.

  3. विविध पक्ष स्थानिक पातळीवर मतदारसंघांचे समीकरण साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

युवराज धोतरे

Udgir Municipal Council News : जिल्ह्यात लातूरनंतर उदगीर हे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. येथे अ वर्ग नगरपालिका असुन या शहरात लिंगायत व मुस्लिम समाजाची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारावरच उदगीरच्या नगरपालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. या मतदारांच्या भूमिकेवर राजकीय पक्षांचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूकीत या समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे.

मंगळवारी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी मिळेल त्याला सोबत घेऊन नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी राजकीय पक्ष तयार झाले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला होता. भाजप 19, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 तर एमआयएम 6 असे पक्षीय बलाबल होते. नगराध्यक्षपदासाठी भाजप, काँग्रेस व एमआयएम यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यात भाजप पहिल्या क्रमांकावर काँग्रेस दुसऱ्या तर एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.

यावेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असुन यात सर्वच राजकीय पक्षात लिंगायत उमेदवार द्यावा की मुस्लिम? असा पेच निर्माण झाला आहे. लिंगायत उमेदवार दिला तर कसे? किंवा मुस्लिम दिला तर परिस्थिती काय राहील? याचे पक्ष पातळीवर मंथन सुरु आहे. गेल्या वेळी एमआयएमचा पक्षाचा उमेदवार नसता तर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता. यावेळी एमआयएमने निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातही मुस्लिम मतदारांची भुमिका काय राहील? यावर सगळ्याच पक्षात खल सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपची युती असून नगरपालिका निवडणुकीत युती करायची की नाही? याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदावर दावा केला आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येण्यासाठी काय परिस्थिती राहील, भाजपच्या उमेदवाराला मुस्लिम मते मिळतील का? याचेही गणित मांडले जात आहे. या उलट भाजपचा उमेदवार हा शंभर टक्के निवडून येणार या अविर्भावात स्थानिक नेते तसेच कार्यकर्ते असल्याचे दिसून येते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी आहे. हे पक्ष आघाडीतूनच लढणार अशी शक्यता आहे. शिवाय आघाडी कडून एमआयएम पक्षाला सुद्धा सोबत घेण्याचे संकेत दिले जात आहेत. जर या तिघांची आघाडी झाली तर महायुतीसाठी ही बाब डोकेदुखी ठरणारी आहे. शिवाय भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार की नाही? यावरही बरेच अवलंबून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची

उदगीर विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी केलेली विकास कामे व नुकताच झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळा आणि त्यांची कार्यकर्ते मतदाराशी असलेली नाळ या बाबी विचारात घेता शहरात पोषक वातावरण निर्मिती झाल्याचे चित्र आहे. भाजपला सोडून स्वबळावर लढल्यास त्यांना मुस्लिम मतेही मिळू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढावे, अशी भावना काही स्थानिक कार्यकर्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

FAQs

प्रश्न 1: उदगीर नगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार आहे?
उत्तर: निवडणुकीची घोषणा झाली असून दोन डिसेंबरला मतदान होणार आहे.

प्रश्न 2: कोणते समाज या निवडणुकीत निर्णायक मानले जात आहेत?
उत्तर: लिंगायत आणि मुस्लिम समाज हे उदगीर नगरपालिकेतील प्रमुख आणि निर्णायक मतदार आहेत.

प्रश्न 3: कोणकोणते पक्ष या स्पर्धेत उतरले आहेत?
उत्तर: भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष या निवडणुकीत आमने-सामने आहेत.

प्रश्न 4: उदगीर नगरपालिकेवर सध्या कोणाचा ताबा आहे?
उत्तर: सध्याची सत्ता स्थानिक राजकीय समीकरणांवर अवलंबून असून आगामी निवडणुकीत बदल होण्याची शक्यता आहे.

प्रश्न 5: उदगीरच्या मतदारसंघात काय विशेष आहे?
उत्तर: विविध समाजघटकांचा समतोल आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित मतदान हा इथल्या राजकारणाचा गाभा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT