Udgir MIDC News : उदगीर एमआयडीसीसाठी भूसंपादन सुरू, स्वप्न सत्यात उतरणार!

The land acquisition process for Udgir MIDC has officially begun, thanks to the dedicated efforts of former minister Sanjay Bansode. : तत्कालीन राज्याचे क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या एमआयडीसीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या सीमा भागाला लागून असलेली उदगीर येथील एमआयडीसी झपाट्याने विकसित होईल.
Sanjay Bansode- Udgir MIDC News
Sanjay Bansode- Udgir MIDC News Sarkarnama
Published on
Updated on

युवराज धोतरे

Marathwada Political News : 1988 मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या उदगीर येथील एमआयडीसीला अखेर मुहूर्त लागला आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एमआयडीसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला तब्बल पंधराशे एकर वर एमआयडीसी उभारली जाणार होती. मात्र आता हे अंतर काही एकरांवर येऊन ठेपले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उदगीरच्या एमआयडीसीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना- भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात या एमआयडीसीच्या इतर कामांना वेग आला. त्यानंतर अखेर या एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

तत्कालीन राज्याचे क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या एमआयडीसीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या सीमा भागाला लागून असलेली उदगीर येथील एमआयडीसी झपाट्याने विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Latur) 95 ते 99 दरम्यान राज्यातील शिवसेना -भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांच्याकडून उदगीर एमआयडीसीला मंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन आमदार मनोहर पटवारी यांनी यासाठी प्रयत्न केले होते.

Sanjay Bansode- Udgir MIDC News
MIDC ला जमीन देण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याची शिंदे सरकारनं केली उचलबांगडी? काय आहे प्रकरण...VIDEO पाहा

परंतु गेल्या 37 वर्षातील उदगीर एमआयडीसी चा प्रवास पाहता तो कासवाला ही लाजवेल असा, होता. एमआयडीसी उभारण्यासाठी ची प्रक्रिया वेगाने गेली असती तर आतापर्यंत येथील उद्योग देश पातळीवर पोहोचले असते. तूर- सोयाबीन यासारख्या पिकांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लातूर जिल्ह्यात उदगीर एमआयडीसीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या असत्या. अनेक वर्ष रखडलेल्या उदगीर एमआयडीसीच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली असली तरी ती अधिक वेगाने कशी, होईल याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sanjay Bansode- Udgir MIDC News
Latur Politics : देशमुख-निलंगेकर मैत्रीचा नवा अध्याय; ‘आम्ही एकत्र यायचे नाही, तर हातात काठ्या घेऊन एकमेकांचा विरोध करायचा का?’

गेल्या पाच वर्षापासून सातत्याने चर्चेत राहणाऱ्या उदगीरच्या एमआयडीसी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी रीतसर 108 शेतकऱ्यांना नोटीसा देऊन 124 हेक्टर 24 आर जमीन संपादित करण्याबाबतच्या कारवाईला सुरुवात केली. 1995 च्या युती शासनाच्या काळात उदगीरचे तत्कालीन आमदार प्रा. मनोहर पटवारी यांनी उदगीरच्या लोणी, तोंडार व हकनकवाडी परीसरात 900 हेक्टर एमआयडीसी मंजूर करून आणली होती.

Sanjay Bansode- Udgir MIDC News
Sanjay Bansode : संजय बनसोडे-संभाजी पाटलांत सौख्य वाढले; लातूरचे राजकीय गणित बदलणार?

मात्र त्यानंतर राजकीय नेतृत्व कमी पडल्याने हळूहळू पुढील कुठल्याही प्रक्रिया पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अनेक वर्षे एमआयडीसीचा फलक लोणीच्या वळणावर दिसायचा. नंतर तो दिसेनासा झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात संजय बनसोडे यांची वर्णी लागल्यानंतर खऱ्या अर्थाने फायलींना वेग मिळाला. तत्कालीन औद्योगिक विकास मंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्याचे मुख्य औद्योगिक विकास प्रकल्प संचालक यांनी दोन वेळा उदगीरला येऊन भेट दिली.

Sanjay Bansode- Udgir MIDC News
Chandrapur MIDC : विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या गावात एमआयडीसीची दैनावस्था

या नियोजित उदगीर औदयोगिक क्षेत्रासाठी मौजे कासराळ (ता.उदगीर) येथील 124.24 हेक्टर आर खाजगी क्षेत्र महाराष्ट्र औदयोगिक विकास अधिनियम 1961 च्या तरतुदीनूसार अधिसुचना 17 आॅगस्ट 2024 च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना कासराळ (ता.उदगीर) येथील जमीन भूसंपादनासाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत.

Sanjay Bansode- Udgir MIDC News
Ncp Mlc Election : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला ! 'या' दिवशी होणार नावाची घोषणा

लातूर नंतर सर्वात मोठी बाजारपेठ ही उदगीरला असुन या भागात तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मागील काळात रस्ते, वीज, पाणी व आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले आहेत. या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. उदगीर तालुक्यातील कासराळ भागात सदर एमआयडीसी होऊन या भागातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.


२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com