Udgir Congress News : उदगीर काँग्रेसचा हुकमी एक्का भाजपने टिपला; राजकीय समीकरणे बदलणार...

Lok Sabha Election 2024 : उदगीरात काँग्रेसला धक्का : विधानसभेसह नगरपालिका निवडणुकीवर परिणाम
Udgir Congress News : उदगीर काँग्रेसचा हुकमी एक्का भाजपने टिपला; राजकीय समीकरणे बदलणार...
Sarkarnama

Latur News : उदगीरमधील काँग्रेसचे बडे नेते राजेश्वर निटुरे यांनी आज मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निटुरे हे सात टर्म उदगीर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीसपदीही ते राहिले आहेत. आज अखेर त्यांनी पक्षाला राम राम ठोकत भाजपत दाखल झाले. (Latest Marathi News)

Udgir Congress News : उदगीर काँग्रेसचा हुकमी एक्का भाजपने टिपला; राजकीय समीकरणे बदलणार...
Shivsena Vs BJP: भाजपचा हस्तक्षेप झुगारण्यासाठीच सीएम नॉट रीचेबल, शिंदे गट एकवटला

उदगीरमधील काँग्रेसचे एक दिग्गज नेते म्हणून त्यांचा परिचय सांगितला जात होता. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी उदगीर महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता खेचून आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांनी काँग्रेसचा दबदबा राखला होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते विश्वासू नेते होते. त्यांनी शासनाच्या अनेक महामंडळावर त्यांनी कार्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udgir Congress News : उदगीर काँग्रेसचा हुकमी एक्का भाजपने टिपला; राजकीय समीकरणे बदलणार...
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

निटुरे यांचे भाजपमध्ये दाखल होण्याने उदगीरची स्थानिक राजकीय गणिते पलटणार आहेत. आता होऊ घातलेली लोकसभा निवडणुकीत त्यांना मदत होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला अधिक बळ मिळणार आहे. उदगीरमध्ये भाजपला नेहमी अडसर ठरणारा नेताच भाजपने टिपल्यामुळे आता मोठा राजकीय फायदा भाजपला होणार आहे.

लातूरमधील काँग्रेसच्या नेतृत्वाने काही काळापासून अलीकडे निटुरे यांना जिल्हा-तालुक्यातील निर्णयप्रक्रियेत डावलण्यात येत असल्याचे निटुरे यांनी अनेक वेळा समाजमाध्यमांवर सांगितले. त्यामुळे त्यांची पक्षात घुसमट होत होती. यामुळे त्यांनी भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्यासोबत तालुक्यातील आणखी काही काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com