MP Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

MP Bajrang Sonawane News : वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजित पवारांच्या ताफ्यात! खासदार बजरंग सोनवणे यांचा दावा

Valmik Karad's car was in Ajit Pawar's convoy during his Massajog meeting : अजित पवार यांच्या मस्साजोग येथील भेटीच्या दौऱ्यात वाल्मिक कराडची गाडी असेल, तर मग याचा अर्थ काय? गाडी कोणाच्या नावावर आहे? असा प्रश्नही बजरंग सोनावणे यांनी उपस्थितीत केला.

Jagdish Pansare

बीड : पवनउर्जा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला. पोलिसांकडे सरेंडर होताना कराडने जी गाडी वापरली होती, तीच गाडी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी 16 डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जेव्हा मस्साजोग मध्ये आले होते, तेव्हा त्यांच्या ताफ्यात होती, असा दावा बीडचे खासदार बजरंग सोवनणे यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे.

अजित पवारांच्या ताफ्यात असलेल्या गाडीतून वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांकडे सरेंडर होतो, याचा अर्थ काय? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थितीत केला आहे. 16 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी (Bajrang Sonawane) खासदार बजरंग सोनवणे, माजीमंत्री राजेश टोपे यांच्यासह मस्साजोग येथे जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.

त्याच दिवशी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी अजित पवार यांच्या ताफ्यात असलेल्या एका गाडीतूनच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

अजित पवार यांच्या मस्साजोग येथील भेटीच्या दौऱ्यात वाल्मिक कराडची गाडी असेल, तर मग याचा अर्थ काय? गाडी कोणाच्या नावावर आहे? असा प्रश्नही बजरंग सोनावणे यांनी उपस्थितीत केला. परळीतून पुणे त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरु असताना पोलीस काय करत होते? 15 डिसेंबरला नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी वाल्मिक कराड नागपूरातच होता, असा दावाही बजरंग सोनवणे यांनी केला.

अवादा कंपनीच्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याने मे महिन्यात तक्रार दाखल केली तेव्हाच जर पोलिसांनी गांभीर्याने हा विषय हाताळला असता तर आज ही वेळ आलीच नसती, असेही सोनवणे म्हणाले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्येशी आपला काहीही संबंध नाही, माझ्यावर आरोप नाही मग मी राजीनामा का देऊ? अशी भूमिका मांडली. त्यानंतर खासदार सोनवणे यांनी केलेल्या या आरापाने खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT