Eknath Shinde, Santosh Deshmukh, Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case : "चुकीचा पायंडा पाडू नका..." सरपंच हत्या प्रकरणावरून शिंदेंचा शिलेदार अजितदादांना भिडला

Vijay Shivtare On Santosh Deshmukh Murder Case : "अख्खा महाराष्ट्र म्हणतोय हे चुकीचं झालंय, त्यामुळे अजितदादांनी प्रखर भूमिका घ्यावी चुकीचा पायंडा पाडू नये," अशा शब्दात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठोस आणि योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

Jagdish Patil

Beed News, 12 Jan : "अख्खा महाराष्ट्र म्हणतोय हे चुकीचं झालंय, त्यामुळे अजितदादांनी प्रखर भूमिका घ्यावी चुकीचा पायंडा पाडू नये," अशा शब्दात शिवसेना (शिंदे) आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात ठोस आणि योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

रविवारी (ता.12) विजयबापू शिवतारे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय राज्यात चुकीचा पायंडा पाडू नये असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला.

देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवतारे (Vijay Shivtre) म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी येऊन परिस्थिती जाणून घेतली. इतक्या वाईट पद्धतीने निर्घृण हत्या कोणत्याही सरपंचाची झालेली नाही हे गंभीर प्रकरण असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोषींवर कारवाई करण्याचा दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मात्र निशाणा साधला. ते म्हणाले, अजितदादा परखड नेतृत्व आहे. मात्र, महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराडचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेल्या विषवल्लीचं त्यांना काहीही वाटत नाही, याचं शल्य आहे.

ज्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्या मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे. अख्खा महाराष्ट्र म्हणतोय की हे चुकीचं झालं आहे, त्यामुळे दादांनी प्रखर भूमिका घ्यावी. चुकीचा पायंडा पाडू नये ही प्रामाणिक विनंती आहे. ते पोलिस ऑफिसर नाहीत, मी धनंजय मुंडेंबाबत बोलणार नाही पण ही विषवल्ली मोडण्याची भूमिका दादांनी घेतली पाहिजे, त्यांनी सर्वसामान्यांमध्ये येऊन बोलावं, मग त्यांना वास्तव समजेल."

दरम्यान, शिवतारे यांनी या सर्व हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच मुख्य बेस असून हे प्रशासनाला कळत नसेल तर आश्चर्य आहे. ही गुंडगिरी आणि पैसे वसुलीची केस आहे याला राजकीय मुलामा शक्यतो लावू नये. गृहमंत्री कडक माणूस आहे, त्यांच्या टप्प्यात आलं की ते कार्यक्रम करतात. त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT