
Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या खून प्रकरणातील फरार असलेल्या एका आरोपीचा व विष्णू चाटेच्या मोबाइलचा शोध घेतला जात असतानाच आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असल्याचे पुढे आले आहे.
बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल झाले होते. यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी ट्विट करून माहित दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना रद्द प्रकरणी 100 जणांना नोटीस पाठवली आहे. त्यावेळी शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निलंबित झाल्यानंतर ही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
खंडणी मागितल्याने सीआयडी (CID) कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हे कोठडीत असल्याने अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच या प्रकरणात अटकेत असलेल्या आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात अटक असल्याने त्याच्या विरोधात मोक्का लावण्यात आला नाही. कराडला मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.