Ajit Pawar : मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न विचारताच अजितदादा चिडले; म्हणाले, ‘तुझी चौकशी ....’

Dhananjay Munde's Resignation Issue : किती वेळा तेच तेच सांगायाचे. संतोष देशमुख खूनप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Santosh Deshmuklh-Ajit Pawar-Dhananjay Munde
Santosh Deshmuklh-Ajit Pawar-Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 12 January : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी सर्वच बाजूंनी दबाव वाढत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आजही पुण्यात आलेल्या अजितदादांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारताच ते चिडले. ‘तुझी चौकशी कधी होईल, तुझं नाव आल्यावरच ना,’ असा सवाल त्यांनी प्रश्न विचारणाऱ्यांना केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना संतोष देशमुख आणि इतर मुद्यांवर प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळी प्रतिक्रिया देताना ते चिडले. ते म्हणाले किती वेळा तेच तेच सांगायाचे. संतोष देशमुख खूनप्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या उत्तरानंतरही पत्रकारांनी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला. आतापर्यंत ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले आहेत. पण, तुम्ही त्यांना पाठीशी घालता, असा आरोप होत आहे, असे विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. ‘तुझी चौकशी कधी होईल. तुझं नाव आल्यावरच ना. एखाद्या प्रकरणात तुझं नावच नसेल, तर तुझी चौकशी काय बळबळं करतील काय रे. काय तुम्हीपण...अशी संतप्त भावना अजितदादांनी व्यक्त केली.

Santosh Deshmuklh-Ajit Pawar-Dhananjay Munde
Shirdi BJP Convention : भाजप अधिवेशनात मंचावर संविधानाची प्रत; काँग्रेसने ‘तो’ दाखला देत साधला निशाणा; ‘तोपर्यंत बेगडी निष्ठेवर प्रश्नचिन्ह’

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या मोर्चातही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला होता. ड्रग्ज केसमध्ये नावं असलेले कैलास सानप आणि आंधळे हे लोक मला धमक्या देत आहेत. ही टोळी संभाळणाऱ्या लोकांना पोसलं जातंय. माझी अजितदादांना विनंती आहे की यांना (धनंजय मुंडे यांचे नाव न घेता) मंत्रिपदावरून दूर करा. त्यांच्याऐवजी कायंदेला मंत्री करा. या लोकांना कशीचीही भीती राहिलेली नाही, ते दिवसा ढवळ्या माणसं मारत आहेत, असा आरोपही धस यांनी केला.

Santosh Deshmuklh-Ajit Pawar-Dhananjay Munde
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी भाजपचा असा आहे मास्टर प्लॅन; कार्यकर्ते लागले कामाला

अवादा कंपनीच्या खंडणीची डिल ज्यांच्या बंगल्यावर झाली आणि निवडणुकीच्या काळात पन्नास लाख रुपये घेण्यात आले. ते मोठे आका यात दोषी कसे नाहीत, असा सवालही त्यांनी केला होता. सरकारी बंगल्यात डील झाली असेल तर ते या प्रकरणात दोषी पाहिजे, असे सांगून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com