Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

...तर विक्रम काळे उस्मानाबादचे आमदार झाले असते : अजित पवारांनी सांगितला तिकिटाचा किस्सा!

त्यांनी मला माझ्या सासूरवाडीची आठवण करून दिली.

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांना उस्मानाबाद (Osmanabad) मतदारसंघाचं तिकिट घ्या म्हणून मी सांगत होतो. पण, त्यांनी घेतलं नाही. त्यांनी तिकिट घ्यायला टाळाटाळ केली. त्यांनी तिकिट घेतले असतं, तर मला खात्री होती की ते नक्की उस्मानाबादचे आमदार (MLA) झाले असते. तेवढं त्यांच्यामध्ये वक्तृत्व आणि कर्तृत्व आहे. पण, कुठं माशी शिंकली माहिती नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीवेळचा तिकिटाचा किस्सा सांगितला. (Vikram Kale would have become Osmanabad MLA if he had taken ticket : Ajit Pawar)

उस्मानाबादरमधील सुरेश पाटील यांच्या एस. पी. शुगर कारखान्याच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी विक्रम काळे यांच्या विधानसभा निवडणुकीतील किश्याद्दल जाहीरपणे सांगितले. अजित पवार म्हणाले की, आमदार विक्रम काळे यांनी त्यांच्या भाषणातून तेरणा सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख केला. त्यांनी मला माझ्या सासूरवाडीची आठवण करून दिली. परंतु विक्रम काळे, उस्मानाबाद जिल्ह्याच्या उस्मानाबाद तालुक्यात पळसं म्हणून गाव आहे. आहे ना?.... कुणाचं आहे..? तर विक्रम काळे यांचं. काळे यांचे वडिलसुद्धा शिक्षक मतदारसंघातून निवडून आले हेाते. हे पण महाराज (विक्रम काळे) तीनदा निवडून आले आहे.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मी त्यांना उस्मानाबाद मतदारसंघाचं तिकिट घ्या म्हणून सांगत होतो. पण, त्यांनी घेतलं नाही. त्यांनी विधानसभा निवडणुकीचं तिकिट घ्यायला टाळाटाळ केली. त्यांनी तिकिट घेतले असतं, तर मला खात्री होती की, ते नक्की उस्मानाबादचे आमदार झाले असते. तेवढं त्यांच्यामध्ये वक्तृत्व आणि कर्तृत्व आहे. शेवटी तालुक्यातील लोकांनाही विचार केला असता की आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आता विधानसभेत जात आहेत. काळे यांच्याबद्दल निश्चितपणे विचार झाला असता. पण, कुठं माशी शिंकली माहिती नाही. विक्रम काळे तिकिट घ्यायला नाही नाहीच म्हणाले. त्यामुळे उस्मानाबादमधून निंबाळकरांना उमेदवारी द्यावी लागली. पण आता मागचं उकरून काय फायदा. झालं गेलं गंगेला मिळालं, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आमदार काळे यांनी मला सांगितले की, तेरणा सहकारी साखर कारखाना घ्या. पण तेरणा कारखान्यासाठी दोन दिग्गज नेते एक म्हणजे लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी टेंडर भरले आहे. दुसरं उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनीही टेंडर भरले आहे, अशी माहिती मिळत आहे. कदाचित चुकीची असेल. पण, सध्या तशी माहिती आहे. दोघांची टेंडर असल्यामुळे तो मुद्दा न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने निर्णय दिल्याशिवाय त्या ठिकाणी कोणाला हात घालता येणार नाही, असे अजित पवार यांनी तेरणा कारखान्यासंदर्भात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT