सोलापूर : शिस्तप्रिय आणि वेळेचे पक्के असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दौऱ्यात नसतानाही शनिवारी (ता. १ ऑक्टोबर) अचानकपणे मध्यरात्री सोलापुरात (Solapur) मुक्काम करावा लागला. नियोजित दौऱ्यानुसार त्यांचा शनिवारचा मुक्काम बारामतीत होता. मात्र, उमरगा येथील कार्यक्रम संपायला उशिरा झाल्याने पवारांना हा निर्णय घ्यावा लागला. (Ajit Pawar decided to stay in Solapur as it was getting late mid night)
विशेष म्हणजे सोलापुरात रात्री उशिरा येऊनही वेळेचे पक्के असणाऱ्या अजितदादांनी सकाळी साडेसहा वाजता तयार होऊन सोलापूर रेल्वे स्टेशनसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते सव्वासात वाजता आपल्या पुढील सातारा दौऱ्यासाठी रवाना झाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे शनिवारी (ता. १ ऑक्टोबर) उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्याच्या दौऱ्यावर हेाते. उस्मानाबादमध्ये एका साखर कारखान्याचा कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांचा दौरा उमरगा येथे होतो. उमरगा येथील कार्यक्रम संपायला अजित पवार यांना उशिरा झाला, त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा प्रवास नको म्हणून सोलापुरातील शासकीस विश्रामगृहात थांबण्याचा निर्णय घेतला.
पवार हे शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास सोलापुरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही रात्री उशिरापर्यंत थांबून होते. आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती असल्याने अजित पवारांनी भल्या सकाळीच रेल्वे स्टेशन गाठत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. वस्तुतः अजित पवार यांचा मुक्काम हा बारामतीत ठरला होता. मात्र, उशिरा झाल्यामुळे आणि रात्रीचा प्रवास नको म्हणून त्यांनी सोलापुरात थांबण्याचा निर्णय घेतला.
सोलापुरात मध्यरात्री पोहोचूनही भल्या सकाळी अजित पवारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. तत्पूर्वी, ते दौंड शुगरचे सचिन शिनगारे यांना भेटून आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.