Vilas Ghule Murder Case Sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule Murder Case : विलास घुले हत्या प्रकरणात भावाचे बेमुदत उपोषण 19 दिवसांनी स्थगित; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या हस्ते ज्यूस घेतला!

Beed protest seeks action in Vilas Ghule murder case as hunger strike ends after 19 days : विलास घुले हत्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी, आरोपींवर मोक्का आणि खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ यांच्या अटकेची मागणी; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या हस्ते रमेश घुले यांनी ज्यूस घेत उपोषण तूर्तास मागे घेतले.

Jagdish Pansare

Beed Protest News : विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजवी सौरभ सोनवणे याला अटक करा, या व इतर मागण्यांसाठी घुले कुटुंबीय गेल्या 19 दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.

दरम्यान, विलास घुले यांच्या पत्नीने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती.

सौरभ सोनवणे याच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चाही काढण्यात आला. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte), जयश्री पाटील हे या मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, विलास घुले यांचे बंधू रमेश यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण आज स्थगित करण्यात आले. सदावर्ते यांच्या हस्ते ज्यूस घेत हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

विलास नवनाथ घुले हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का लावण्यासह विविध मागण्यांसाठी मागील 19 दिवसांपासून बीड (BEED) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले घुले कुटुंबीयांचे बेमुदत उपोषण अखेर शुक्रवारी (ता. 21) स्थगित करण्यात आले.

​या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी घुले कुटुंबीय आक्रमक पवित्रा घेऊन उपोषणाला बसले होते. शुक्रवारी या प्रकरणावरून ओबीसी समाजाचा प्रचंड विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. त्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमध्ये उपोषणस्थळी भेट दिली.

यावेळी उपोषणकर्त्यांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, मागण्यांसंदर्भात सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर अ‍ॅड. सदावर्ते यांच्या हस्ते ज्यूस घेऊन रमेश घुले यांनी उपोषण स्थगित केले.

या प्रकरणात पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कायदेशीर बडगा उगारला जाईपर्यंत आमचा न्यायालयीन व कायदेशीर लढा असाच सुरू राहील, असा इशारा सदावर्ते यांनी दिला. दरम्यान, सौरभ सोनवणे यांच्या अटकेची मागणी करत मोर्चेकरी आक्रमक झाले होते. एफआयआरमध्ये नोंद आणि सीडीआरमध्ये आढळलेल्या गोष्टीनंतरही सौरभ सोनवणेला अटक का केली जात नाही? असा सवाल आंदोलकांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT