Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawane sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनावणेंच्या मुलाचं नाव का आलं? स्वतः खासदारांनीच सांगितलं

Vilas Ghule Murder Case: संतोष देशमुख प्रकरणानंतर आता बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणाची चर्चा सुरु असून यामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचं पुरवणी आरोपपत्रात आलं आहे.

Amit Ujagare

Vilas Ghule Murder Case: संतोष देशमुख प्रकरणानंतर आता बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणाची चर्चा सुरु असून यामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचं पुरवणी आरोपपत्रात आलं आहे. पण या संपूर्ण प्रकरणावरच खासदार सोनावणे यांनी आक्षेप घेतला असून आपल्या मुलाचं नाव सुरुवातीला यात नव्हतं पण ते अचानक कसं आलं? याबाबत बजरंग सोनावणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाचं अर्थात एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक टीम चौकशीसाठी खासदार बजरंग सोनावणे यांच्या 'पवनसूत' या निवासस्थानी पोहोचलं. त्यानंतर सोनावणे या कारवाईवर व्यक्त झाले आहेत. याप्रकरणात बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरव सोनावणे यांचं नाव पुरवणी जबाबात नोंद करण्यात आलं आहे. एसआयटीनं खासदारांच्या बंगल्यावर येऊन तिथले सीसीटीव्ही तपासले आहेत.

तपास पथकाच्या या कारवाईवर सोनावणे म्हणाले, "तपास पथकाचा रोख काय होता याचा अनुमान मी नाही काढणार. पण दहावा आरोपी जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगाव की दहावा आरोपी कोण आहे? कारण दहावा आरोपी त्यात कोणीही झालेला नाही. पण तो जबाबामध्ये आहे, पण तो दहावा हे की अकरावा आहे हे मला माहिती नाही. पण याबाबत माझ्या मुलाचं नाव नक्की आहे. त्यामुळं आता दहावा आरोपी म्हणून कोणाला अटक करायची हे त्यांनी सांगावं. त्यापद्धतीनं ते सांगतील. त्यानुसार पोलिसांचं खरं असेल तर ते करतील"

या प्रकरणाला जातीयवादाचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे, यावर बोलताना सोनावणे म्हणाले, "मुंडे स्वतःचा अनुभव सांगत असतील. त्यामुळं मला यावर जास्त काही बोलायचं नाही. ते जसं वागतात तसंच दुसरेही वागत असतील असं त्यांना वाटत असेल, अशा शब्दांत बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेंवर पलटवार केला"

सोनावणे यांचा पोलिसांवर दबाव असल्याच्या आरोपांना उत्तर देतान खासदार म्हणाले, "जो फिर्यादी आहे त्याच्यावर माझा संशय आहे. या व्यक्तीबाबत सध्या तरी पुरावे नाहीत पण हळूहळू ते समोर येतील. माने या व्यक्तीमुळं घुलेचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबांनीच केला आहे. पण मानेला मारायलाच ते का गेले? याचा पण खोलातून तपास झाला पाहिजे. पण या प्रकरणात राजकीय लोक जे काही बोलत आहेत त्यावर मला जास्त भाष्य करायचं नाही. पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर तपासात तो आरोपी असेल तर त्याला आरोपी करतील"

पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कथा पुन्हा घडवण्याचा हा प्रकार सुरु आहे. जशी ही घटना घडली तशीच घटना दाखवायची, कॉपी टू मिरर असं त्यांना करायचं आहे, पण असं नाही होणार. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे कमीत कमी तुमचे १०० कॉल असतील पण माझा सिंगल कॉल दाखवा. पोलीस अधीक्षकांशिवाय मी कोणालाही फोन केलेला नाही. त्यांना फोनही याचसाठी केला की हे प्रकरण काय आहे? ते मला सांगा. पण त्यावेळी मला अधीक्षक देखील बोललेच नाहीत की तुमच्या मुलाचं यात नाव नाही. यापूर्वी या प्रकरणात खासदाराचीच चर्चा चालली पण खासदारचं पंधरादिवस बाहेर आहे म्हटल्यावर मग त्याचा मुलगा घ्या, असं हे प्रकरण आहे, असा आरोपही बजरंग सोनावणे यांनी यावेळी केला.

याप्रकरणातील माने हा हॉटेलवर काम करणारा गरीब व्यक्ती आहे, त्याला मारण्याचा कट का रचला गेला. तो गुन्हेगारही नाही, पण त्याला मारण्याच्या आडून जे मारायला आले त्यांचाच काहीतरी महत्वाचा गुन्हा लपवायचा असेल, असंही होऊ शकतं. त्यामुळं याचा तपास मी करायला लावणार आहे. माझ्या हातात बरेच पुरावे आहेत, त्यामुळं ते मी नंतर सांगेनच. पण पोलीस तपासाचा भाग म्हणून खासदार म्हणून माझा फोन जप्त करु शकणार नसतील तरी माझ्या मुलाचा करु शकतात, अशी भूमिकाही यावेळी बजरंग सोनावणे यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT